News Flash

‘हेलिकॉप्टर इला’ मधूम कमबॅक करण्यास काजोल सज्ज

या चित्रपटामध्ये काजोलबरोबर रिद्धी सेनदेखील स्क्रिन शेअर करणार आहे.

काजोल

बॉलिवूडमध्ये आपल्या खट्याळ स्वभावामुळे प्रत्येक चित्रपट गाजविणारी अभिनेत्री काजोल पुन्हा एकदा चंदेरी दुनियेमध्ये पाऊल ठेवण्यास सज्ज झाली आहे. काजोलने गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या पडद्यापासून फारकत घेतली होती. मात्र ती लवकरच आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

काजोल ‘हेलिकॉप्टर इला’ या आगामी चित्रपटामध्ये झळकणार असून या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. या चित्रपटाचं पोस्टर काजोलने तिच्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर केलं आहे.विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती अभिनेता अजय देवगणने केली आहे.

गायिका होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या महिलेच्या जीवनावर हा चित्रपट आधारित असून गायिका होण्यासाठी या महिलेला जो संघर्ष करावा लागतो तो संघर्ष या चित्रपटाच्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटामध्ये रिद्धी सेन काजोलच्या भूमिकेत झळकणार आहे.

दरम्यान, अजय देवगणबरोबरच जयंतीलाल गडा हेदेखील  या चित्रपटाची निर्मितीमध्ये हातभार लावणार असून प्रदीप सरकार यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘हेलिकॉप्टर इला’ येत्या १४ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2018 2:09 pm

Web Title: kajol upcoming movie helikoptar ila poster release share
Next Stories
1 दिग्दर्शकानेच इशान-जान्हवीला दिला होता सैराट न पाहण्याचा सल्ला
2 फुटबॉल प्रशिक्षकाच्या बायोपिकमध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत
3 जबाबदारीची जाणीव करुन देणाऱ्या ‘आक्रंदन’ची पहिली झलक
Just Now!
X