09 August 2020

News Flash

Photo : अॅक्शनचा तडका असलेलं ‘कलंक’मधील नवीन पोस्टर प्रदर्शित

या पोस्टरमध्ये वरुणच्या चेहऱ्यावर करारी भाव दिसून येत आहेत.

कलंक

बहुप्रतिक्षित आणि तितकाच बहुचर्चित ठरत असलेला ‘कलंक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तगडी स्टारकास्ट, भव्यदिव्य सेट आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील कथानक या साऱ्यांचा चित्रपटामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यातच चित्रपटातील भूमिकांवरील पडदा दूर सारण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच आता या चित्रपटातील वरुण धवन एक पोस्टर प्रदर्शित झालं आहे. प्रदर्शित झालेलं हे पोस्टर वरुणने ट्विटरवर शेअर केलं आहे.

अभिषेक वर्मा दिग्दर्शित ‘कलंक’ हा चित्रपट २०१९ या वर्षातला बिग बजेट चित्रपट असल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटामध्ये आलिया भट्ट, वरुण धवन, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर ही स्टारमंडळी झळकणार आहे. यामध्ये वरुणने जफर ही व्यक्तिरेखा साकारली असून त्याचा चित्रपटातील लूक समोर आला आहे.

प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये वरुण साहसदृश्य करताना दिसत आहे. यामध्ये वरुण बुल फाईट करत आहे. विशेष म्हणजे हे पोस्टर ‘बाहुबली’ चित्रपटातील भल्लालदेवच्या बुल फाईटशी मिळतंजुळतं आहे. या पोस्टरला वरुणने ‘An iron-hearted man with an unapologetic attitude’, असं कॅप्शन दिलं आहे.

या चित्रपटामध्ये वरुणच्या अनेक साहसदृश्यांचा समावेश असून बहुतांश दृश्य त्याने स्वत: केली आहेत. या चित्रपटाचा काळ ४० च्या दशकातील असून या चित्रपटाच्या कथेची कल्पना करण जोहरच्या वडीलांना यश जोहर यांना १५ वर्षापूर्वी सुचली होती. मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्त सापडता नव्हता. मात्र करणला हा मुहूर्त सापडला असून लवकरच त्याच्या वडीलांच स्वप्न सत्यात उतरणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2019 5:50 pm

Web Title: kalank new poster featuring varun dhawan in action mode bull fight photo
Next Stories
1 आमिरच्या चित्रपटाची कथा लिहिणार अतुल कुलकर्णी
2 वाढदिवसाच्या दिवशी आमिर सचिनला म्हणतोय ‘आता क्या खंडाला?’
3 ..म्हणून प्रिया बापटने ‘चक दे इंडिया’ला दिला होता नकार
Just Now!
X