04 March 2021

News Flash

Photo : कल्की कोचलीन दुसऱ्यांदा संसार थाटण्यास सज्ज?

अनुराग कश्यप व कल्की २०१५ मध्ये विभक्त झाले.

कल्की कोचलीनने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला फोटो

चौकटीबाहेरच्या भूमिका साकारण्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कल्की कोचलीन गेल्या बऱ्याच दिवसांपासून सिंगल होती. पण, आता मात्र ती सिंगलवरुन मिंगल होण्यास तयार आहे. कल्कीच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला फोटो. बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गसोबतचा फोटो कल्कीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपला घटस्फोट दिल्यानंतर कल्की अभिनेता जिम सर्भला डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं. पण गेल्या काही महिन्यांपासून कल्की तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गायसोबतचे बरेच फोटो पोस्ट करताना दिसत आहे.

कल्कीने रविवारी पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये गाय तिच्या गालावर किस करताना पाहायला मिळत आहे. गाय हर्शबर्गच्या आईनेही त्यांच्या काही पोस्टमध्ये कल्कीला टॅग केलं आहे. गाय हा इस्रायलमधील संगीतकार आहे. तो सध्या जेरूसेलम इथल्या संगीत व नृत्य अकादमीत पियानो शिकत आहे.

दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर कल्कीने २०११ मध्ये अनुराग कश्यपशी लग्न केलं होतं. या दोघांनी बऱ्याच चित्रपटांसाठी एकत्र काम केलं. २०१५ मध्ये या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र घटस्फोटानंतरही ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अनुरागच्या ‘सेक्रेड गेम्स २’ या वेब सीरिजमध्ये कल्कीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2019 1:43 pm

Web Title: kalki koechlin confirms relationship with boyfriend guy hershberg watch photo ssv 92
Next Stories
1 मादाम तुसाँ संग्रहालयात श्रीदेवींचा मेणाचा पुतळा, पाहा व्हिडीओ
2 हिंदू आहेस की मुस्लीम? गणेशोत्सवावरून सारा अली खानला कट्टरपंथीयांचा सवाल
3 Video : विसर्जन मिरवणुकीत सलमानचा जबरदस्त डान्स
Just Now!
X