बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीन कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरदेखील तितकीच सक्रीय आहे. बऱ्याचदा ती तिच्या मुलीचे काही फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. विशेष म्हणजे तिच्या चिमुकलीचे फोटोदेखील क्षणभरात वाऱ्यासारखे व्हायरल होतात. अलिकडेच कल्कीने तिच्या बाळाचा न्यूडल्स खाताना एक फोटो शेअर केला आहे.
कल्कीने तिच्या बाळासोबत नवीन वर्षाचं स्वागत केलं असून या वेळचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मात्र, यातील तिच्या मुलीचा एक फोटो चांगलाच चर्चेत आला आहे. अभिनेत्री सयानी गुप्ताने कल्कीच्या मुलीचा फोटो काढला असून त्यात ही चिमुकली न्युडल्स खाताना दिसत आहे.
View this post on Instagram
‘श्वास घ्या..आपल्या प्लानच्या संख्येची मोजणी करु नका आणि फक्त आरामात न्युडल्स खाण्याचा आनंद घ्या’, असं कॅप्शन कल्कीने या फोटोला दिलं आहे. कल्कीने ७ फेब्रुवारी २०२० मध्ये तिच्या बाळाला जन्म दिला असून कल्की सध्या प्रियकर गाय हर्शबर्गसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 7, 2021 1:59 pm