News Flash

‘ब्लू प्लॅनेट २’ सिनेमाच्या प्रिमीयरला या कलाकारांची लावली हजेरी

श्वास रोखायला लावतील अशा भव्य दृश्यांसह यंदाच्या उन्हाळ्यात या कथेचा आगळावेगळा अनुभव सर्वांनी घ्यायवा असाच आहे

सोनी बीबीसी अर्थ या भारतातील पहिल्या वास्तववादी मनोरंजनात्मक वाहिनीने मुंबईत आयोजित केलेल्या ‘ब्लू प्लॅनेट २’ च्या ब्लू कार्पेट प्रिमीयर सोहळ्याला टीव्ही, समाजमाध्यम आणि चित्रपटसृष्टीतील बहुसंख्य मंडळी उपस्थित होती आणि यावेळी लाईट्स, कॅमेरा यानंतर अॅक्शनचा अनोखा अनुभव उपस्थितांना लुटता आला. १८ मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झालेला हा शो २२ शहरांतील पीव्हीआर सिनेमांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या प्रिमीयर सोहळ्याला अर्जून रामपाल, सोनू निगम, दिया मिर्झा, कोंकणा सेन शर्मा, कल्की कोचलीन, सोहा अली खान, आर.बाल्की, सोनाली बेंद्रे, सुमीत व्यास, राकेश ओम प्रकाश मेहरा, झायेद खान, राहूल बोस, भारती सिंग, करण सिंग ग्रोव्हर, ऋत्विक धनजानी, आशा नेगी, मिनी माथूर, तारा शर्मा, रिधी डोगरा, कानन गिल आणि मल्लिका दुवा आदी कलाकार उपस्थित होते.

त्यांनी पृथ्वीवरील महासागरांप्रती आपले प्रेम व जिव्हाळा व्यक्त केला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या समुद्रांतर्गत सफरीची मजा आपल्या सेलिब्रिटी पालकांसोबत आलेल्या सर्व बालकलाकारांनी लुटली. मासे, कासव, डॉल्फिन्स यांना पाहण्याचा अद्वितीय आनंद मुलांना अनुभवता आला.

समुद्राच्या पाण्याखालचे जग प्रेक्षकांना दाखवून एक नवा, अद्भूत अनुभव देणारी ‘ब्लू प्लॅनेट २’ ही सुंदर कथा आहे. ३९ देशांत १२५ प्रवासी मोहिमा आखून तब्बल चार वर्षे या कथेचे चित्रीकरण करण्यात आले असून ‘ब्लू प्लॅनेट २’ ही कथा निसर्ग इतिहासाचे जनक सर डेव्हिड अटेनबरो यांनी कथन केली आहे. याला जगप्रसिद्ध संगीतकार हान्स झिमर यांनी संगीत दिले आहे. श्वास रोखायला लावतील अशा भव्य दृश्यांसह यंदाच्या उन्हाळ्यात या कथेचा आगळावेगळा अनुभव सर्वांनी घ्यायवा असाच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2018 8:26 pm

Web Title: kalki soha ali khan konkona sensharma blue planet 2
Next Stories
1 रोमान्स आणि ड्रामासाठी हा विकेण्ड ठेवा राखून
2 मिशन इम्पॉसिबलः फॉलआउटचा ट्रेलर पाहिलात का?
3 शरद पवारांनी आमिर खानला दिला ‘हा’ सल्ला
Just Now!
X