मोहित सुरीचा ‘कलयूग’ चित्रपट आठवतोय का… चित्रपटातील कुणाल खेमूच्या पत्नीची भूमिका साकारणारी स्माइली सुरी अनेकांना भावली होती… हीच अभिनेत्री काही वर्षांनी डिप्रेशनमध्ये गेली होती.. पण या लढवय्या अभिनेत्री डिप्रेशनवर मात केली असून ती आता प्रोफेशनल पोल डान्सर झाली आहे.

स्माइली सुरी या अभिनेत्रीने २००५ मध्ये ‘कलयुग’ चित्रपटातून बॉलिवूडमधून पदार्पण केले. कुणाल खेमू- स्माइली ही जोडी प्रेक्षकांना भावली होती. स्माइलीच्या चेहऱ्यावरच्या निरागसता प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करुन गेली. या चित्रपटानंतर काही वर्षांनी स्माइली सुरी डिप्रेशनमध्ये गेली. तिचे वजनही चांगलेच वाढले होते. पण स्माइली या कठीण प्रसंगात खचली नाही. तिने यावर मात करत पोल डान्सचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. यासाठी तिने सात आठवडे सिंगापूरमध्ये प्रशिक्षणही घेतले. बॉलिवूड व हॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये पोल डान्सविषयी नेहमीच चुकीचे चित्र दाखवण्यात आले. मात्र, माझ्यासाठी हा संपूर्ण वेगळा अनुभव होता, असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते. पण आता पोल डान्सकडे एक खेळ म्हणून बघितले जाते. माझा भाऊ मोहीत सुरी आणि चुलत भाऊ इम्रान हाश्मी यांनी देखील मला मोलाची साथ दिली, असे तिने स्पष्ट केले होते. स्माइलीच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरही पोल डान्ससंदर्भातील व्हिडिओज दिसून येतात. तिच्यातील हा बदल इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

Child beaten teacher pune, pune,
पुणे : शिक्षिकेकडून मुलाला बेदम मारहाण; समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित
suparna shyam play important role in new show
निलेश साबळेच्या नव्या शोमध्ये झळकणार ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेत्याची पत्नी! आजवर लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम
Pavan Davuluri
मायक्रोसॉफ्टची धुरा भारतीय वंशाच्या पवन दावुलुरी यांच्या हाती; जाणून घ्या त्यांची कारकीर्द?
akshay kumar stepped on alaya F dress video viral
भर कार्यक्रमात अक्षय कुमारने ठेवला प्रसिद्ध अभिनेत्रीच्या ड्रेसवर पाय अन् तिने केलं असं काही…, व्हिडीओ व्हायरल

https://www.instagram.com/p/Be8zKzKBpLw/