03 March 2021

News Flash

“…तर आदित्य चोप्रा निर्माता नव्हे सर्जरी तज्ज्ञ असते”; अभिनेत्याचा उपरोधिक टोला

यशराज बॅनरच्या चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री प्लास्टिक सर्जरी का करतात?

कमाल आर. खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच बॉलिवूडमधील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. यावेळी त्याने प्रसिद्ध चित्रपट निर्माता आदित्य चोप्रा यांच्यावर निशाणा साधला आहे. जर अदित्य निर्माते नसते तर ते शस्त्रक्रिया तज्ज्ञ नक्कीच झाले असते असा टोला केआरकेने लगावला आहे.

अवश्य पाहा – हे घर आहे की शहर… पाहा मायकल जॅक्सनचं अब्जावधींचं घर

“एका अभिनेत्रीनं मला सांगितलं आदित्य आपल्या चित्रपटातील प्रत्येक अभिनेत्रीला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे त्यांच्या चित्रपटात झळकलेल्या प्रत्येक अभिनेत्रीनं कुठलीना कुठली प्लास्टिक सर्जरी केलेली असतेच. खरं सांगायचं झालं तर ते चित्रपट निर्माता नसते तर शस्त्रक्रिया तज्ज्ञ नक्कीच झाले असते.” अशा आशयाचं ट्विट केआरकेनं केलं. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – प्रियांकाचा ग्लॅमरस लूक पाहून हृतिक झाला घायाळ; म्हणाला, तू तर…

अवश्य पाहा – “हॅण्डल विथ केअर नाहीतर…”; स्ट्रिपलेस फोटो शेअर करत क्रितीने दिला इशारा

यापूर्वी कमाल खानने शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर टीका केली होती. “अन्नदाता शेतकरी नाही राहिला तर काय माती आणि दगड खाऊन जिवंत राहणार आहात का? हात जोडून आपल्या अन्नदाताची माफी मागा. आम्ही शेतरकरी होतो, आहोत आणि शेवटपर्यंत शेतकरीच राहू. तुम्ही आम्हाला देशद्रोही म्हणा किंवा दहशतवादी. लक्षात ठेवा मत मागायला याल तेव्हा आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवू.” अशा आशयाची दोन ट्विट्स करुन केआरकेने आपला संताप व्यक्त केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 4:02 pm

Web Title: kamaal r khan aditya chopra yash raj films mppg 94
Next Stories
1 अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक
2 ‘रुचिका कपूर आणि तिच्या कुटुंबीयांचा…’, शाहीर शेखने केला लग्नाबाबत खुलासा
3 माधुरी दीक्षितने शेअर केला पती आणि मुलांसोबतचा व्हिडीओ, म्हणाली..
Just Now!
X