25 October 2020

News Flash

२ लाखांपेक्षा जास्त करोनाग्रस्त, हजारोंचा मृत्यू, सरकार चूक मान्य करणार का? अभिनेत्याचा सवाल

त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी मागच्या दोन महिन्यांपासून देशामध्ये लॉकडाउन सुरु होता. पण केंद्र सरकारने काल अनलॉकडाउनच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. अशातच सतत चर्चेत असणारा अभिनेता आणि स्वयंम घोषीत चित्रपट समिक्षक कमाल आर खानने केलेले ट्विट चर्चेत आहे. त्याने या ट्विटमधून सरकारवर निशाणा साधला आहे.

कमाल आर खानने ट्विटमध्ये, ‘म्हणून सरकारने #Lockdown आज जवळपास संपवला आहे. भारत १ जून २०२०ला पुन्हा सुरु होणार. जेव्हा देशात जवळपास २ लाख लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच २००० हून अधिक लोकांचा अनियोजित लॉकडाउनने बळी घेतला आहे. आता सरकार त्यांची चुक मान्य करणार का? कधीच नाही. कारण ही गरिबांची समस्या आहे’ असे म्हटले आहे.

केआरकेचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. यापूर्वीही कमाल आर खानने सोशल मीडियाद्वारे त्याचे मत मांडले होते. पण बऱ्याचवेळा त्याला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो.

राज्य सरकारने ३० जूनपर्यंत लॉक़डाउन कायम ठेवले आहे. पण हळूहळू टप्याटप्याने गोष्टी सुरु होणार आहेत. त्यासाठी ठाकरे सरकारने मिशन बीगिन अगेनचे धोरण आखले आहे. यामध्ये टप्याटप्याने व्यवहार सुरु होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 8:42 pm

Web Title: kamaal r khan aka krk slams modi government says will they accept the mistake avb 95
Next Stories
1 नागार्जुनच्या सुनेवर निशाणा साधल्यामुळे पूजा हेगडेवर चाहते नाराज
2 रिंकू राजगुरुला रॅपर रफ्तारकडून खास गिफ्ट
3 अजयमुळे मी आजही अविवाहित आहे, तब्बूचा खुलासा
Just Now!
X