09 July 2020

News Flash

हॉटस्टार घराणेशाहीचा प्रचारक; अभिनेत्याने साधला डिस्नेवर निशाणा

बॉलिवूड कलाकारांच्या वर्च्युल कॉन्फरंसवर अभिनेत्याने केले घराणेशाहीचे आरोप

करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे सिनेमागृह आणखी काही काळ बंदच राहणार आहेत. परिणामी बॉलिवूडमधील काही मोठ्या चित्रपटांवर आता OTT प्लॅटफॉर्मवरच प्रदर्शित होण्याची वेळ आली आहे. दरम्यान हॉटस्टारने अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवन, आलिया भट्ट, अभिषेक बच्चन अशा काही कलाकारांची वर्च्युल कॉन्फरंस घेऊन आगामी सात चित्रपटांची घोषणा केली. मात्र या कॉन्फरंसवर अभिनेता कमाल आर खानने घराणेशाहीचा आरोप केला आहे. तसंच हॉटस्टार बॉलिवूडमधील घराणेशाहीला पाठिंबा देत असल्याचेही त्याने म्हटले आहे.

अवश्य पाहा – अखेरच्या काळात पंचमदांना काम का मिळालं नाही?; जावेद अख्तर म्हणाले…

अवश्य पाहा – “सलमानला खरंच कलाकार म्हणावं का?”; Wikipedia पेज पोस्ट करुन अभिनेत्याने उडवली खिल्ली

“कोणीतरी मला डिस्ने प्लस हॉटस्टारचा आयडी आणि पासवर्ड द्या. मला घराणेशाहीवाल्यांची प्रेस कॉन्फरंस पाहायची आहे. घराणेशाहीला पाठिंबा देणाऱ्या हॉटस्टारला मी सबस्क्राईब करणार नाही. सुशांतला लक्षात ठेवून आपण घराणेशाहीचा बहिष्कार करायला हवा.” अशा आशयाचं ट्विट कमाल खानने केलं आहे.

कमाल खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच विविध क्षेत्रातील कलाकारांवर टीका करत असतो. यावेळी त्याने चक्क हॉटस्टारवर निशाणा साधला आहे. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2020 7:21 pm

Web Title: kamaal r khan comment disney hotstar to announce seven films mppg 94
Next Stories
1 यंदा वारी नाही म्हणे, खरं हाय का? पंढरीच्या विठूरायासाठी संकर्षणची खास कविता
2 या सुपरस्टारने ‘दीवाना’ चित्रपटासाठी सुचवले होते शाहरुख खानचे नाव
3 हुमा कुरैशीला वीज बिलाचा झटका, ट्विट करत म्हणाली…
Just Now!
X