News Flash

सलमानचं करिअर डेंजर झोनमध्ये? ऑनलाईन पोलमध्ये भाईजानला नेटकऱ्यांची नापसंती

अभिनेत्याच्या पोलमध्ये ७६ टक्के नेटकऱ्यांनी सलमानला दर्शवली नापसंती

अभिनेता कमाल आर. खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. यावेळी त्याने बॉलिवूडचा भाईजान सलमान खानवर निशाणा साधला आहे. सलमानचं करिअर आता संपलं आहे. ७५ टक्के प्रेक्षकांना सलमानचे चित्रपट पाहायचे नाहीत असा धक्कादायक दावा त्याने केला आहे.

कमाल खानने ट्विटरवर एक प्रश्न विचारला होता. सलमानचं करिअर संपल्यानंतर त्याला कुठल्या प्लॅटफॉर्मवर पाहायला आवडेल? या प्रश्नावर कमालने वेब सीरिज, टीव्ही मालिका, गाणी, आणि कुठेही नाही असे एकूण चार पर्याय दिले होते. आश्चर्याची बाब म्हणजे ७६ टक्के नेटकऱ्यांनी कुठेही नाही या पर्यायावर आपलं मत दिलं आहे. थोडक्यात काय तर त्यांना सलमानला कुठेही पाहायचं नाही. याच पोलच्या आधारावर केआरकेने सलमानचं करिअर आता संपलं आहे असा दावा केला आहे.

कमाल खानने यापूर्वी देखील सलमानवर निशाणा साधला होता. त्याने सलमानचे विकिपिडिया पेज पोस्ट करुन त्याची खिल्ली उडवली होती. सलमान खान बॉलिवूडमधील वादग्रस्त अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याच्यावर आजवर अनेक कायदेशीर खटले देखील दाखल करण्यात आले आहेत. या खटल्यांचे संदर्भ त्याच्या विकिपिडिया पेजवर देखील पाहायला मिळतात. या पेजचे काही स्क्रिन शॉट पोस्ट करुन कमाल खानने सलमानची खिल्ली उडवली होती. “सल्लूचं हे Wikipedia पेज पाहा याला अभिनेता म्हणावं की….” अशा आशयाचं ट्विट केआरकेनं केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 7:27 pm

Web Title: kamaal r khan criticised salman khan over online poll mppg 94
Next Stories
1 Instagram Rich List 2020: ड्वेन जॉन्सन एका पोस्टसाठी घेतो ७ कोटी रुपये
2 ‘जोधा अकबर’मधील गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी लागले होते तब्बल ९ तास
3 बबिताच्या अदांवर टप्पू झाला फिदा; कॉमेंट करुन म्हणाला…
Just Now!
X