News Flash

‘गरीबांवर असा अत्याचार भारतातच होऊ शकतो’; तो व्हिडीओ पाहून अभिनेत्याची पोलिसांवर टीका

'तो' व्हिडीओ पाहून अभिनेता पोलिसांवर प्रचंड संतापला

मध्यप्रदेशातील गुना या ठिकाणी एका शेतकरी कुटुंबावर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन विरोधी पक्षांनी भाजपावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान अभिनेता कमाल आर खान याने देखील या प्रकरणावरुन सरकारवर निशाणा साधला आहे. गरीबांवर असा अमानुष हल्ला फक्त भारतातच होऊ शकतो अशी टीका त्याने केली आहे.

“गरीबांवर असा अमानुष हल्ला फक्त भारतातच होऊ शकतो. आपल्याला आता लाजही वाटत नाही. खरंच या लोकांना पोलीस दलात सामिल करण्यापूर्वी योग्य प्रशिक्षण मिळतं का?” अशा आशयाचे ट्विट करुन कमाल खानने या प्रकरणाबाबत आपला संताप व्यक्त केला आहे. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

यापूर्वी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी देखील या प्रकरणावरुन भाजपावर निशाणा साधला होता. “गरीबांवर हल्ला, दलितांवर हल्ला, शेतकऱ्यांवर हल्ला, लोकशाहीवर हल्ला हाच आहे भाजपाचा खरा चेहरा आणि चरित्र. याविरोधात काँग्रेस निकराने लढा देणार” असं ट्विट त्यांनी केलं होतं. बुधवारी सोशल मीडियावर एका शेतकरी दाम्पत्याला पोलीस अत्यंत अमानुषपणे मारहाण करत आहेत हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि शिवराज सिंग चौहान सरकारवर टीका होण्यास सुरुवात झाली. एका शेतकरी दाम्पत्याला पोलिसांनी मारहाण केली. या व्हिडीओत त्यांना काही लोक वाचवण्याचाही प्रयत्न करत असताना दिसत आहेत. मात्र त्यांनाही पोलिसांनी मारहाण केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 7:16 pm

Web Title: kamaal r khan criticized mp police over viral video mppg 94
Next Stories
1 “हा पदार्थ मी आयुष्यभर न कंटाळता खाऊ शकते”; दीपिकाचं भन्नाट उत्तर
2 हाच खरा नायक! ६ वर्षांच्या ‘सुपरहिरो’ला फरहान अख्तरने केला सलाम
3 सुधीर मुनगंटीवारांनी शेअर केला ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेचा व्हिडीओ, म्हणाले..
Just Now!
X