वाढत्या लॉकडाउनमुळे देशभरातील लोक सध्या त्रस्त आहेत. लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहेत. उद्योगधंदे बंद झाले आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांसाठी तर जीवनमरणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे या प्रतिकूल परिस्थितीत त्वरीत लॉकडाउन उठवावा अशी मागणी अभिनेता कमाल खानने सरकारकडे केली आहे. करोनाचे संक्रमण वाटते तितके भयंकर नाही, असाही दावा त्याने केला आहे.

अवश्य पाहा – आणखी एका ‘पॉर्नस्टार’ची बॉलिवूडमध्ये एण्ट्री; राम गोपाल वर्मांच्या चित्रपटात करणार काम

“करोना विषाणू तेव्हाच धोकादायक ठरतो जेव्हा दिवसाला एक लाख लोक मरण पावतात. परंतु हा आकडा सध्या ७५ हजारांच्या आसपास आहे. करोना हा इतर आजारांसारखाच एक सामान्य आजार आहे. त्यामुळे भीतीचा खेळ खेळू नका. लवकरात लवकर लॉकडाउन उठवा.” अशा आशयाचे ट्विट कमाल खानने केले आहे.

कमाल खान आपल्या वादग्रस्त आणि चित्रविचित्र वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या काही काळात तो लॉकडाउनच्या निमित्ताने सातत्याने मोदी सरकारवर टीका करत आहे. या पार्श्वभूमीवर त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.