26 February 2021

News Flash

“मला घर खर्चाला ५ कोटी लागतात, युट्यूबच्या पैशातून पाण्याचं बिलही भरता येणार नाही”

टीकाकारांना अभिनेत्याचं प्रत्युत्तर

अभिनेता कमाल आर. खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. चर्चेत राहुन पैसे कमावण्यासाठी तो अशी विचित्र विधानं करतो, असं म्हटलं जातं. मात्र सातत्याने होणाऱ्या या टीकेवर आता केआरकेने प्रत्युत्तर दिलं आहे. त्याला घर खर्चासाठी पाच कोटी रुपये लागतात असं त्याने म्हटलं आहे.

“अनेकजण म्हणतात केवळ पैसे कमावण्यासाठी मी युट्यूब व्हिडीओ करतो. परंतु हे खोटं आहे पैशांसाठी मी व्हिडीओ करत नाही. वर्षाला घर खर्चासाठीच मला पाच कोटी रुपये लागतात. युट्यूबवरुन मिळालेल्या पैशांमध्ये माझं पाण्याचं बिल देखील भरलं जाणार नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन केआरकेने टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

केआरकेचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी केआरके खोटं बोलतोय असं म्हणत त्याची खिल्ली देखील उडवली आहे. यापूर्वी त्याने ‘युट्यूब’ विरुद्ध ‘टिक-टॉक’ वादात उडी मारली होती. “मी स्वत:च एक ब्रँड आहे. मी ‘टिक-टॉक’ किंवा ‘युट्यूब’ यांपैकी कोणाचाही बाजूने नाही. मी त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. माझी बरोबरी करण्यासाठी या ओटीटी प्लॅटफॉर्म्सला सात वेळा जन्म घ्यावा लागेल. मी कोणाचाही बाजूने नाही किंवा विरोधात नाही. मी तटस्थ आहे.” असं ट्विट त्याने केलं होतं. मात्र या ट्विटमुळे नेटकऱ्यांनी त्याची प्रचंड खिल्ली उडवली होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 7:36 pm

Web Title: kamaal r khan my house expenses is 5 cr rs per year mppg 94
Next Stories
1 मनीष पॉल घेतोय अरुण गोविल यांच्याकडून धनुष्यबाण चालविण्याचे धडे!
2 हसत नाही तर रडत केली राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात
3 ‘ती फेक न्यूज’; निगेटिव्ह करोना रिपोर्टबाबत अमिताभ बच्चन यांचं ट्विट
Just Now!
X