News Flash

“मी तुझं करिअर संपवून टाकेन आणि…”, केआरकेचे सलमानला आव्हान

कमाल आर खानचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

अभिनेता कमाल आर खान हा त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून कमाल आर खान हा सतत बॉलिवूडचा भाईजान सलमान खानवर निशाना साधताना दिसतो. यावेळी केआरकेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सलमानचे करिअर संपवून टाकेन असे म्हणतं खानला आव्हान केले आहे.

कमाल आर खानची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. केआरकेने त्याच्या ट्विटवर अकाऊंटवरून एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्याने सलमानचे नाव न घेता त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव घेत त्याला टोला लगावला आहे. “बॉलिवूडचा गुंडा भाई, बघ तुझ्यात भांडण्याची हिम्मच असेल तर स्वत: पुढे येऊन लढा दे! हे चिरकुट गायक, संघर्ष करणारी अभिनेत्री वगैरे यांना पुढे करुन, त्यांच्यामागे लपू नकोस. मी वचन देतो की मी तुझं करिअर नष्ट करुन तुला टीव्ही अभिनेता बनवले. हा तुझा #अंतिम वेळ आहे,” अशा आशयाचे ट्वीट केआरकेने केले आहे. सलमानचे नाव न घेता केआरकेने सलमानचा आगामी चित्रपट ‘अंतिम’चे नाव घेतले आहे.

एवढंच नाही तर या आधी केआरकेने सलमानच्या विरोधात आणखी एक ट्वीट केलं होते. त्यात तो म्हणाला होता की,”मी ऐकले आहे की बर्‍याच लोकांना त्यांचे करिअर गमवावे लागले आहे. पण म्हणतात ना की जश्याच तसे. तर मी तसाच आहे. याच करिअर मी संपवून टाकेन, मी याला रस्त्यावर आणेल,” असे ट्वीट त्याने केले होते.

आणखी वाचा : “तिने माझे मानसिक आणि शारिरीक शोषण केले…”, शिवम पाटीलने अभिनेत्रीवर केला आरोप

दरम्यान, सलमानच्या टीमने केआरके विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. चित्रपटाचा रिव्हू्य दिल्याने मानहानीचा दावा दाखल केला असा आरोप केआरकेने केला होता. मात्र, ही गोष्ट चुकीची असल्याचे सलमानच्या टीमने सांगितले आहे. सलमान भ्रष्टाचारी आहे, आणि त्याचे ब्रॅंड ‘बिंग ह्युमन’ हे सगळ्यांची फसवणूक, हेराफेरी आणि ते मनी लॉंड्रींगच्या व्यवसायात गुंतले आहेत असा आरोप केला, त्यामुळे केआरके विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2021 2:16 pm

Web Title: kamaal r khan promises to destroy salman khans career says its your antim time dcp 98
Next Stories
1 ‘या’ कारणासाठी विशाल दादलानीने ‘इंडियन आयडल १२ ‘मध्ये पुन्हा येण्यास नकार दिला आहे.
2 न्यूड सीन देण्याआधी राधिका आणि आदिल मध्ये झाले होते ‘हे’ बोलणे
3 समर प्रताप जहागीरदार की विजय धावडे? काय आहे समरचं खरं रुप
Just Now!
X