21 September 2020

News Flash

“..तर मी ‘सडक २’ विरोधात कायदेशीर कारवाई करेन”; अभिनेत्याचा इशारा

'सडक २'चा ट्रेलर पाहून अभिनेता संतापला

दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या बहुचर्चित ‘सडक २’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. मात्र या ट्रेलरवर प्रेक्षकांनी डिसलाईकचा भडिमार केला आहे. काही मिनिटांत ९९ हजारांपेक्षा अधिक डिसलाईक या ट्रेलरला मिळाले आहेत. या प्रकारावर आता अभिनेता कमाल आर. खान याने प्रतिक्रिया दिली आहे. जर फॉक्स स्टार हिंदीने खोटे लाईक्स खरेदी करण्याचा प्रयत्न केला तर मी त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करेन, असा धमकीवजा इशारा कमाल खानने दिला आहे.

अवश्य पाहा – सुशांत मृत्यू प्रकरण: स्वरा भास्करचा रिया चक्रवर्तीला पाठिंबा

अवश्य पाहा – Video : मराठीतलं पहिलं देशभक्तीपर रँप साँग पाहिलं ‘का?’

कमाल आर. खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच बॉलिवूड सेलिब्रिटींवर टीका करत असतो. यावेळी त्याने महेश भट्ट यांच्या ‘सडक२’ या चित्रपटावर निशाणा साधला आहे. “कृपया फॉक्स स्टार हिंदीने ‘सडक २’ साठी खोटे लाईक्स खरेदी करु नये. जर त्यांनी असे खोटे लाईक खरेदी करुन प्रेक्षकांना फसवण्याचा प्रयत्न केला तर मी त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करेन.” अशा आशयाचं ट्विट केआरकेने केलं आहे. सुशांत मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्याचं हे ट्वट सध्या चर्चेत आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणामुळे सध्या बॉलिवूडमधील घराणेशाहीवर जोरदार टीका होत आहे. यामध्ये सर्वाधिक टीका महेश भट्ट आणि त्यांच्या कुटुंबियांवर केली जात आहे. सुशांत प्रकरणी महेश भट्ट यांची मुंबई पोलिसांनी चौकशी देखील केली होती. सध्या प्रेक्षकांमध्ये महेश भट्ट यांच्याबाबत प्रचंड नाराजी आहे. परिणामी ‘सडक २’ चित्रपटाच्या ट्रेलरवर डिसलाईकचा भडिमार होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2020 2:18 pm

Web Title: kamaal r khan sadak 2 fox star hindi legal action mppg 94
Next Stories
1 रियाचा फोन नंबर समजून नवी मुंबईतील तरुणाला धमकीचे कॉल आणि मेसेजेस
2 ‘सत्या’ चित्रपटातील भूमिकेबद्दल महिमा चौधरीचा गौप्यस्फोट
3 सुशांत सिंह राजपुत मृत्यू प्रकरणाचा ‘सडक २’ला बसला फटका
Just Now!
X