जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरातील करोनाबाधितांची रुग्ण संख्या आता 52 हजार 952 वर पोहचली आहे. त्यामुळे बॉलिवूड कलाकार सोशल मीडियाच्या माध्यामातून जनजागृतीचा संदेश देताना दिसत आहे. अशाताच बॉलिवूड अभिनेता कमाल आर खानने ‘मला असे वाटते की आता लवकरच महायुद्ध होणार आहे’ सोशल मीडियावर ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
‘मला नाही माहित का? पण मला असे वाटते की लवकरच महायुद्ध होणार आहे. जगाचा विनाश होणार आहे’ असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून लोकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
I don’t know why? But I am feeling that #worldwar is going to happen soon. The world is going to finish. So bye friends. Love you all.
— KRK (@kamaalrkhan) May 6, 2020
कमाल आर खान नेहमी त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ओळखला जातो. तो बऱ्याच वेळा बिनधास्तपणे त्याचे मत मांडत असतो. अनेकदा सामाजिक विषयांवर मत मांडल्यामुळे त्याला ट्रोल करण्यात आले आहे.
केआरकेने ‘देशद्रोही’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो बिग बॉस ३ या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आला होता. तो एक स्वयंमघोषीत चित्रपट व्यापर विश्लेषक म्हणून देखील ओळखला जातो.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 7, 2020 2:48 pm