News Flash

संघाच्या नावाने खडे फोडणं थांबवा; केआरकेचं मुस्लिमांना आवाहन

त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून आंदोलनं केली जात आहेत. या संदर्भात स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खानने ट्विट करत देशातील मुस्लिमांना आवाहन केले आहे. सध्या त्याचे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून अनेकजण त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

‘मी सर्व मुस्लीम बांधवांना विनंती करतो की त्यांनी आरएसएसने मुस्लिमांसोबत हे केले आहे आणि पोलिसांनी मुस्लिमांसोबत ते केले आहे असे मेसेजेस व्हॉट्स अॅपवर पाठवणे बंद करावे. तुम्ही हे सर्व करुन मुस्लिमांना मदत करण्याऐवजी त्यांच्या अडचणी वाढवत आहात. त्यामुळे कृपया शांतता राखा’ असे ट्विट करत कमालने मुस्लिमांना आवाहन केले आहे.

कमाल आर खान सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सामाजिक विषयांवर तो बऱ्याच वेळा त्याची मते मांडताना दिसतो. काही दिवसांपूर्वी केआरकेने त्याच्या ट्विटमध्ये सलमानच्या ‘दबंग ३’ चित्रपटाचा ट्रेलर सुपर फ्लॉप आहे असे म्हटले होते. तसेच चित्रपटातील गाणीदेखील फ्लॉप आहेत. केवळ रिक्षाचालक हा चित्रपट पाहण्यासाठी जातील. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्तीत जास्त १५० कोटींची कमाई करु शकतो त्या पुढे जाणार नाही. म्हणजेच हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरणार आहे असे ट्विट करत त्याने ‘दबंग ३’ चित्रपटाबाबत भविष्यवाणी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 12:08 pm

Web Title: kamaal r khan tweet to muslims on caa and nrc avb 95
Next Stories
1 वडील-मुलीचं नातं समृद्ध करणारी ‘वेगळी वाट’
2 अखेर फराह खानला मागावी लागली माफी
3 अभिनेत्रीने हातावर गोंदवलं लैंगिक अत्याचार करणाऱ्याचं नाव
Just Now!
X