News Flash

‘अक्षयकडे आता २-३ वर्ष शिल्लक’, अभिनेत्याचे ट्वीट चर्चेत

अभिनेत्याने साधला अक्षय कुमारवर निशाणा

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. अक्षयचे एकापाठोपाठ एक चित्रपट प्रदर्शित होत असल्याचे पाहायला मिळते. ‘सूर्यवंशी’, ‘बच्चन पांडे’, ‘बेलबॉटम’ हे अक्षय कुमारचे चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. दरम्यान अभिनेता कमाल राशिद खानने केलेल्या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कमाल आर खानचे प्रत्येक ट्विट चर्चेचा विषय ठरते. विविध विषयांवर कोणीही विचारले नसताना हा स्वयंघोषित चित्रपट समीक्षक त्याची मते मांडताना दिसतो. सेलिब्रिटी त्याच्या ट्वीटकडे फारसे लक्ष देत नसले तरी नेटकरी मात्र त्याच्या ट्वीटची आतुरतेने वाट पाहात असतात. त्याला अनेक वेळा ट्रोल करतात. आता कमाल आर खानने ट्वीट करत अक्षय कुमारवर निशाणा साधला आहे.

आणखी वाचा : कॅमेऱ्यापासून दूर असणाऱ्या अक्षयच्या मेहूणीचा फोटो पुन्हा चर्चेत

कमालने ट्वीटमध्ये अक्षयकडे आता पैसे कमावण्यासाठी दोन ते तीनवर्षच शिल्लक असल्याचे म्हटले आहे. ‘अक्षय कुमारच्या चित्रपटाचे हक्क खरेदी करण्यासाठी कोणी मिळत नाही. त्याचा सूर्यवंशी आणि बेलबॉटम चित्रपट प्रदर्शित होऊ शकत नाही. तो एकापाठोपाठ एक नव्या चित्रपटांची घोषण करतोय. कारण आता पैसे कमावण्यासाठी अक्षयकडे २ ते ३ वर्षच शिल्लक आहेत. वेडे निर्माते त्याला चित्रपटासाठी १२५ कोटी रुपये देतात’ या आशयाचे ट्वीट केले आहे.

केआरकेच्या या ट्वीटवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने तर तू अक्षय कुमारवर जळतोस का? असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने तुला काय वाटते हे कोणी विचारले आहे का? असे म्हणत सुनावले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 11:48 am

Web Title: kamaal rashid khan krk tweet against akshay kumar and says he have 2 or 3 years only avb 95
Next Stories
1 लग्नानंतर २७ वर्षे पतीपासून लांब राहत होत्या अल्का याज्ञिक, जाणून घ्या कारण
2 ‘सुंदरलाल’ पाठोपाठ ‘तारक मेहता..’मधील आणखी एका अभिनेत्याला करोनाची लागण
3 मी गर्भवती आहे की, पिझ्झा खाल्याने पोट असं दिसतंय; अभिनेत्रीचा अजब सवाल
Just Now!
X