30 October 2020

News Flash

‘या’ कारणामुळे सारिकाशी केले होते कमल हासनने लग्न

१९८८ मध्ये त्यांनी सारिकाशी विवाह केला

चित्रपटांसोबतच राजकीय विधानांमुळे सतत चर्चत असणारा अभिनेता म्हणजे कमल हासन. कमल हासन बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये देखील तितकाच लोकप्रिय आहे. ‘सदमा’,’चाची 420′ असे सुपरहिट चित्रपट देणारा अभिनेता कमल हासनचा आज ७ नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. त्याने आपल्या प्रयोगशील अभिनयाने एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे.

कमल हासन केवळ उत्कृष्ठ अभिनेताच नसून लोकप्रिय दिग्दर्शक व प्लेबॅक सिंगर म्हणून ओळखला जातो. कमल हासनने एक बाल कलाकार म्हणून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. ‘कलाथुर कन्नामा’ हा त्याचा पहिलावहिला चित्रपट होता. त्यानंतर ‘एक दुजे के लिए’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. त्यानंतर ‘सागर’, ‘गिरफ्तार’, ‘जरा सी जिंदगी’, ‘राज तिलक’, ‘एक नई पहेली’, ‘चाची 420’, ‘हे राम’ अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्याने काम केले. त्यातील ‘चाची 420’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विशेष कमाई करत कमल हासनने साकारलेल्या स्त्री भूमिकेचे कौतुक झाले.

आणखी वाचा : डोक्यात गेली प्रसिद्धीची हवा, रानू मंडल यांचं वागणं बदललं

कमल हासनच्या अभिनयासोबतच अफेअरच्या चर्चा देखील त्यावेळी जोरदार रंगल्या होत्या. कमल हासनचे ७०च्या दशकात अभिनेत्री श्रीविद्यासोबत अफेअर होते. त्यानंतर १९७८ साली कमल हासनने वाणी गणपतीसोबत लग्न केले. मात्र त्यांचा संसार १० वर्षे टिकला. त्यानंतर कमल हासनच्या आयुष्यात सारिकाची एण्ट्री झाली. कमल हासन आणि सारिका लिव्ह इनमध्ये राहू लागले. मात्र सारिका गर्भवती असल्याचे समजताच १९८८ मध्ये त्यांनी विवाह केला असल्याच्या चर्चा होत्या. त्यांना श्रृती आणि अक्षया या दोन मुली आहेत. कमल हासनने २००४ मध्ये सारिकापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा : मंदिरा बेदीला मुलगी दत्तक घ्यायची आहे पण…

त्यानंतर कमल हासनने २२ वर्षांनी लहान असलेल्या सिमरनला डेट करण्यास सुरुवात केली. मात्र त्याचे हे नातेही फार काळ टिकले नाही. सिमरनने तिच्या बालपणीच्या मित्रासोबत लग्न केले. या सर्वानंतर कमल हासनच्या आयुष्यात गौतमीची एण्ट्री झाली. त्यावेळी त्यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या. मात्र १३ वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहून अखेर २०१६ मध्ये दोघांनी नात्याला पूर्णविराम लावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 10:39 am

Web Title: kamal haasan birthday special to know about his personal life avb 95
Next Stories
1 रणवीर सिंगच्या त्या ट्विटला नागपूर पोलिसांनी दिले ‘खतरनाक’ उत्तर
2 सलमान खानला वाटतेय ‘या’ गोष्टीची भीती
3 ‘ग्लॅमर’साठी ‘वाट्टेल ते’ करु नका
Just Now!
X