12 December 2017

News Flash

श्रुतीमुळे कमल हसन यांच्या जीवाला घोर..

कमल यांनी यासंदर्भात श्रुतीशीही चर्चा केली

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: March 14, 2017 6:33 PM

श्रुती हसन आणि तथाकथित प्रियकर मायकल कोरसेल यांच्याबद्दल आतापर्यंत खूपदा बोललं गेलं आहे. मुंबई विमानतळावर त्यांना एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्यातल्या नात्याबद्दल बी-टाऊनमध्ये अधिकच बोललं जात आहे. पण त्यांच्या या नात्याची कमल हसन यांना भलतीच चिंता लागून राहिली आहे.

त्यांची चिंता एवढी वाढली की, कमल यांच्या निकटवर्तीयाने सांगितले की, श्रुती त्याच्या प्रियकरासोबत सार्वजनिक ठिकाणी फिरते याची कमल यांना काळजी वाटते. सार्वजनिक ठिकाणी अशापद्धतीने फिरल्यानंतर प्रसारमाध्यमांमध्ये कशाप्रकारच्या बातम्या येतील याचीच त्यांना अधिक काळजी वाटते. एवढेच काय तर कमल यांनी यासंदर्भात श्रुतीशीही चर्चा केली, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

कमल हसन यांचा युके- इंडिया सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मायकलसोबतचा फोटो पाहून अनेकांच्य भुवया उंचावल्या गेल्या होत्या. अगदी थोड्याच वेळात हा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला होता. मायकेल कोरसेलने ड्रामा सेंटर लंडनमधून पदवी संपादन केली आहे. कमल हसन यांच्या आगामी सिनेमांबद्दल चर्चा केली तर, विनोदीपट सबाश नायडू या सिनेमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. या सिनेमाशिवाय दाक्षिणात्य सिनेमाचा हा सुपरस्टार लवकरच विश्वरुपम २ या सिनेमाच्या तयारीला लागला आहे. २०१७ मध्येच या सिनेमाचे प्रदर्शन करण्याचा कमल हसन यांचा मानस आहे.

तर, दुसरीकडे श्रुती हसन बिग स्टार पवन कल्याण याच्यासोबत कतमरयुडु या तामिळ सिनेमात दिसणार आहे. उगडी या सणाच्या दिवशी हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा विचार सध्या निर्माते करत आहेत. उगडी हे कन्नड आणि तेलगु प्रांतातील लोकांचा नवीन वर्षाचा सण असतो.

Thankyou Shruti reddy for my super fun custom made dress so in love with it 💕❤️💕

A post shared by @shrutzhaasan on

First Published on March 14, 2017 5:57 pm

Web Title: kamal haasan shruti michael corsale relationship