19 October 2019

News Flash

या चित्रपटानंतर कमल हसन घेणार चित्रपटातून संन्यास

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतलं एक नावाजलेलं नाव म्हणजे कमल हसन.

कमल हसन

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतलं एक नावाजलेलं नाव म्हणजे कमल हसन. आगामी चित्रपट ‘इंडियन’च्या सिक्वलनंतर ते चित्रपटातून संन्यास घेणार आहेत. याबद्दलची माहिती त्यांनी स्वत: सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. राजकारणासाठी अधिकाधिक वेळ देता यावा यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

”इंडियन २’ हा माझा अखेरचा चित्रपट असेल. यानंतर मी अभिनय कायमचा सोडणार आहे,’ असं त्यांनी सांगितलं. १९९६ मध्ये बॉक्स ऑफीसवर तुफान गाजलेल्या ‘इंडियन’ या चित्रपटाचा हा सिक्वल आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून कमल हसन यांनी राजकारणात सक्रीय प्रवेश केला. मक्कल निधी मय्यम हा पक्ष स्थापन करत त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. ‘मी आतापर्यंत प्रेक्षकांच्या मनात राहत होतो. पण, आता राजकारणाच्या माध्यमातून मला तामिळनाडूच्या जनतेच्या घराघरात पोहोचायचं आहे, जनतेत राहायचं आहे. राजकारणात सक्रिय असताना जनसेवेलाच माझं प्राधान्य असेल’, असे ते म्हणाले होते.

Video : प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी रोहित शेट्टीने केला पत्रकाराचा अपमान

येत्या काही दिवसांत ‘इंडियन २’च्या शूटींगला सुरू होणार आहे. यामध्ये कमल हसन यांच्यासोबत काजल अग्रवालची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ‘2.0’चे दिग्दर्शक शंकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.

First Published on December 4, 2018 4:25 pm

Web Title: kamal haasan to quit acting after his upcoming film indian 2 focus on politics