अभिनेता कमल हासन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या पायाच्या हाडात संसर्ग झाल्यामुळे त्यांना शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. याविषयीची माहिती त्यांची लेक आणि अभिनेत्री श्रुती हासन हिने ट्विट करत दिली आहे.

कमल हासन यांना चेन्नईतील श्री रामचंद्र मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. “त्यांच्या पायाच्या हाडामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे काळजीचं कारण नाही”, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये सांगण्यात आली आहे.


कमल हासन यांच्या पायाला काही वर्षांपूर्वी दुखापत झाली होती. त्यातच आता पायाला इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांना ही शस्त्रक्रिया करावी लागत आहे.