05 July 2020

News Flash

कमाल खानकडून कन्हैयाला दोन लाखांचे गिफ्ट!

कन्हैया कुमारला मी त्याच्या दमदार भाषणासाठी दोन लाख रुपये भेट म्हणून देणार आहे.

कमाल आर खान

बॉलीवूडचा वादग्रस्त चेहरा कमाल खान याने देशद्रोहाचा आरोप असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या(जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारला दोन लाख रुपये भेट म्हणून देण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भातील ट्विट कमाल खान याने आपल्या ट्विटर हॅण्डलवर केले आहे.
कमाल खान ट्विटमध्ये म्हणतो की, कन्हैया कुमारला मी त्याच्या दमदार भाषणासाठी दोन लाख रुपये भेट म्हणून देणार आहे. कोणीतरी माझ्या दिल्लीतील कार्यालयातून ते पैसे घ्यावेत. कन्हैयाचे भाषण हे नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ च्या तोडीचे आहे. मी याआधीही बोललो होतो की मोदींना विद्यार्थ्यांसोबतचे शत्रुत्व महागात पडेल. खरंतर कन्हैयाने मोदींचे आभार मानायला हवेतत. त्यांच्यामुळे तो एक रिअल लाईफ हिरो आणि भविष्यातील राजकारणी झाला आहे, असेही कमाल म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2016 8:46 pm

Web Title: kamal khan announce 2lakh gift for speech of kanhaiya kumar
टॅग Kanhaiya Kumar
Next Stories
1 ‘सुलतान’साठी सलमानचे चिमुकल्यांसोबत चित्रीकरण
2 ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
3 पाहाः प्रशांत दामले, सुबोध भावे यांच्या भो भो चित्रपटाचा मोशन पोस्टर
Just Now!
X