News Flash

‘मोदीजी पुढचे आणखी १० वर्ष पंतप्रधान रहावेत, कारण मला भक्तांना…’, अभिनेत्याचं देवाला साकडे

त्याचे हे ट्वीट चर्चेत आहे.

कमाल आर खानचे प्रत्येक ट्विट चर्चेचा विषय ठरते. विविध विषयांवर कोणीही विचारले नसताना हा स्वयंघोषित चित्रपट समीक्षक त्याची मते मांडताना दिसतो. सेलिब्रिटी त्याच्या ट्विटकडे फारसे लक्ष देत नसले तरी नेटकरी मात्र त्याच्या ट्विटची आतुरतेने वाट पाहात असतात. त्याला अनेक वेळा ट्रोल करतात. आता कमाल आर खानने ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढचे आणखी १० वर्षे भारताचे पंतप्रधान म्हणून रहावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे.

कमाल आर खानने ‘मी देवाकडे प्रार्थना करतो की मोदीजी हे पुढचे आणखी १० वर्षे पंतप्रधान रहावेत. कारण मला भक्तांना रस्त्यावर गळ्यात झोळी आणि अंतर्वस्त्र परिधान केलेल्या वेशात पाहायचे आहे’ या आशयाचे ट्वीट केले आहे. त्याच्या या ट्वीटवर अनेकांनी कमेंट केल्याअसून सध्या हे ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’ फेम मुनमुन दत्ताच्या अटकेची मागणी, जाणून घ्या कारण

कमाल आर खान हा सोशल मीडिया पोस्टमुळे कायमच चर्चेत असतो. त्याचे प्रत्येक ट्वीट हे वादग्रस्त ठरत असते. आता देखील त्याने केलेले ट्वीट चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 1:11 pm

Web Title: kamal r khan krk tweet viral on social media avb 95
Next Stories
1 घराबाहेर लोकांना सरबत देताना दिसला सोनू सूद ; राखी सावंतच्या वक्तव्यावर दिली प्रतिक्रिया
2 लवकरच भेटीला येणार ‘पवित्र रिश्ता २’ ; पुन्हा अंकिता लोखंडे बनणार अर्चना देशमुख
3 …म्हणून टॉम क्रूजने परत केले तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार
Just Now!
X