News Flash

‘हप्पू सिंह की उलटन पलटन’ मालिकेचे शूटिंग थांबले ; हे काम करतेय अभिनेत्री कामना पाठक

लॉकडाउन काळात कसा वेळ घालवतेय ?

महाराष्ट्रात करोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. बॉलिवूड प्रमाणे आता टीव्ही क्षेत्रावरही याचा प्रभाव दिसू लागलाय. टिव्ही क्षेत्रातील बऱ्याच मालिकांचं चित्रीकरण बंद करण्यात येतंय. &TV चॅनलवरील सुपरहिट मालिका ‘भाभीजी घर पर हैं’ नंतर त्याच प्रोडक्शन हाऊसची आणखी दुसरी मालिका ‘हप्पू सिंह की उलटन पलटन’ ही सुद्धा प्रेक्षकांच्या मनात बसली. करोना काळात घरी अडकून बसलेल्या प्रेक्षकांसाठी ही मालिका तर मनोरंजनचा खजिना देणारी ठरतेय. सध्याच्या लॉकडाउन काळात अनेक घरांमध्ये सर्व कुटूंब एकत्र बसून ही मालिका पाहू लागले आहेत.

परंतू करोना परिस्थितीमुळे या मालिकेचं शूटिंग थांबवण्यात आलंय. त्यामुळे या मालिकेतली इनस्पेक्टर हप्पू सिंहची पत्नी राजेशची भूमिका करणारी अभिनेत्री कामना पाठक आता काय करतेय, असा प्रश्न सगळ्यांनाच पडू लागला. लॉकडाउनमुळे अभिनेत्री कामना पाठक तिच्या मूळ गाव इंदोरपासून दूर मुंबईत अडकली आहे. लॉकडाउन काळात मिळालेला मोकळा वेळ ती कसा घालवतेय, याबद्दल तिने सांगितलंय.

अभिनेत्री कामना पाठक तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वेगवेगळे फोटे शेअर करत असते. सध्याच्या काळात ती वेगवेगळी पुस्तके वाचून वेळ घालवतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kamna Pathak (@kamna03)

‘हप्पु सिंह की उलटन पलटन’ मालिकाबद्दल ती म्हणाली, “जेव्हा या मालिकेला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळू लागला तेव्हा खरंच खूप छान वाटू लागलं…हे सगळं पाहून आपण आपल्या करियरच्या योग्य मार्गावर आहोत”, असं वाटतंय.
यापुढे बोलताना ती म्हणाली, “पण आणखी मनात विचार येतो की आपण आणखी उत्तम काम करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे… म्हणूनच मी माझं काम अधिक पटीने उत्तम कसं करू शकते यासाठी कायम प्रयत्न करीत असते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kamna Pathak (@kamna03)

अभिनेत्री कामना पाठक पुढे म्हणाली, “या मालिकेत काम सुरू केल्यापासून मी स्वतःमध्ये खूप बदल झालेला पाहतेय…माझं वय खूपच कमी आहे, हे तुम्हा सगळ्यांना माहिती असेलच..पण तरीही मी या मालिकेत ९ मुलांच्या आईची भूमिका करतेय. तसंच या ९ मुलांपैकी एक मुलगी असून ती कॉलेजला जाणारी दाखवली आहे.”

कामना पुढे म्हणाली, “जेव्हा तुमच्या वयापेक्षाही जास्त वयाची भूमिक निभवता तेव्हा कुठे ना कुठे तुम्ही स्वतःला त्याच वयात पाहण्याची सवय लागते. सेटवर मालिकेची शूटिंग सुरू असताना कित्येकदा तर मी ९ मुलांना खऱ्या आईसारखंच वागत असते. त्यावेळी जेव्हा हीच मुलं जेव्हा दीदी म्हणून बोलतात तेव्हा मला आठवतं की मी यांची दीदी आहे, खरी आई नाही.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 4:13 pm

Web Title: kamna pathak engaged in other work after happu singh ki ultan paltan shooting shuts down prp 93
Next Stories
1 “आरक्षण नाही, भाषेला अभिजात दर्जा नाही, मायभूमीत…”; मराठी दिग्दर्शक संतापला
2 Video: ‘शादी के साइड इफेक्ट्स’, संकेत भोसलेने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
3 “मोदीजी तुम्हाला लाज वाटत नाही का?”, ‘त्या’ व्हिडीओ नंतर पायल रोहतगी ट्रोल
Just Now!
X