अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. अलिकडेच तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. या वक्तव्यामुळे तिच्यावर प्रचंड टीका झाली. त्यानंतर मोदी सरकारने कंगनाला Y+ श्रेणीतील सुरक्षा दिली. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री काम्या पंजाबी हिने कंगनावर निशाणा साधला आहे. ‘जस्टिस फॉर सुशांत’ म्हणत सुरु झालेलं प्रकरण आता ‘जस्टिज फॉर कंगना’वर आलंय, असा उपरोधिक टोला तिने लगावला आहे.

अवश्य पाहा – कंगनाने केलं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ट्विट, म्हणाली…

अवश्य पाहा – “या देशात अल्पसंख्यांक असणं गुन्हा आहे”; उमर खलिदच्या अटकेवर अभिनेता संतापला

“जस्टिस फॉर सुशांत असं म्हणत सुरु झालेलं हे प्रकरण आता जस्टिस फॉर कंगना आणि जस्टिस फॉर रवी किशन पर्यंत पोहोचलंय. उद्या कोणी दुसरा येईल परवा कोणी तीसरा. गटर कोण आहे? ड्रग्स कोण घेत होतं? Y+ श्रेणीतील सुरक्षा कोणी घेतली? विचार करा या सर्व घडामोडिंमध्ये सुशांत कुठे आहे?” अशा आशयाचं ट्विट करुन काम्याने कंगनावर जोरदार टीका केली आहे. तिचं हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

गेल्या काही दिवसांपासून कंगना रणौत सातत्याने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करत आहे. ‘मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय?’ या वक्तव्यानंतर अनेकांना कंगनाला मुंबईत न येण्याची ताकीद दिली होती. यावर कंगनानं ‘महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही, मी मराठा आहे, काय उखडायचं ते उखडा’, असं म्हटलं होतं. त्यानंतर कंगना रणौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकाम तोडलं. त्यामुळे हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी मुंबई विमानताळवर कंगना विरोधात घोषणाबाजी देखील केली होती.