07 March 2021

News Flash

बिग बॉस: “पुरुषांना कोपऱ्यात नेणं थांबव”; काम्या पंजाबी राखीवर संतापली

राखी-निक्कीमध्ये जोरदार भांडण; अश्लिल शब्द ऐकून काम्या पंजाबी संतापली

बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. ती नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असते. मात्र यावेळी ती बिग बॉसच्या घरात केलेल्या अश्लिल शब्दप्रयोगांमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री काम्या पंजाबी राखीवर संतापली आहे. “तुझी ही कृती अत्यंत निराशाजनक आहे.” असं म्हणत तिने आपली नाराजी व्यक्त केली आहे.

अवश्य पाहा – “शीख, मुस्लिम, हिंदू प्रत्येक जण माझ्या विरोधात”; कंगनाने व्यक्त केलं दु:ख

अवश्य पाहा – सोज्वळ सुनेचा बिकिनी अवतार; हॉट फोटोशूटमुळे चाहते अवाक

“राखी सावंत तू किती मोठी एंटटेनर आहेस यानं काहीच फरक पडत नाही. पुरुषांना कोपऱ्यात नेऊन चुकीची माहिती देणं थांबव. तुझी ही कृती अत्यंत निराशाजनक आहे. कान उघडे ठेव, शब्दांवर मर्यादा ठेव अन् प्रामाणिकपणे खेळ.” अशा आशयाचं ट्विट काम्याने केलं आहे. काम्या देखील बिग बॉसची माजी स्पर्धक आहे. या पार्श्वभूमीवर तिने केलेलं हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – अरे बापरे… ही अभिनेत्री एका फोटोशूटसाठी घेते २०० कोटी

यापूर्वी अभिनेत्री निक्की तांबोळीच्या आईनं राखीवर निशाणा साधला होता. “राखी अत्यंत बेजबाबदार स्त्री आहे. आपण काय बोलतोय याचं देखील तिला भान नसतं. वाद-विवाद करण्याची देखील एक पद्धत असते. शिव्या न देता, अश्लिल शब्दप्रयोग न करता सभ्य भाषेत आपण एखाद्याशी वाद घालू शकतो हे तिला माहितच नाही. बहुदा आई-वडिलांनी तिच्यावर असेच संस्कार केले असावेत. असो, तिने शिवीगाळ करत इतर कोणाशीची बोलावं पण माझ्या मुलीच्या बाबतीत बोलू नये.” असा इशारा त्यांनी स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2020 6:00 pm

Web Title: kamya punjabi rakhi sawant bigg boss 14 mppg 94
Next Stories
1 सलमान आणि अजय आमने-सामने! एकाच दिवशी होणार बिग बजेट चित्रपटांची टक्कर
2 चला हवा येऊद्याच्या मंचावर ‘देवमाणूस’ची चर्चा; सरु आजींनी केला रॉकिंग परफॉर्मन्स
3 ट्रोलिंगच्या विषयावर करीनाने मांडली स्पष्ट भूमिका म्हणाली…
Just Now!
X