अभिनेत्री कंगना रणौत ‘थलायवी’ सिनेमामुळे चर्चेत असतानाच आता कंगनाने तिच्या आणखी एका आगामी सिनेमाची घोषणा केलीय. कंगनाने ती ‘सीता’ या सिनेमात सीतेची भूमिका साकारणार असल्याचं जाहीर केलंय. कंगनाने याआधी देखील सीतेची भूमिका साकारली असल्याचं आपल्या चाहत्यांना सांगितलं आहे.

कंगना रणौतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो कंगनाच्या बालपणीचा आहे. फोटो शेअर करत कंगनाने म्हंटलंय. “मी सीतेची भूमिका देखील साकारली आहे. जेव्हा मी १२ वर्षांची होते. शाळेतील नाटकात मी ही भूमिका साकारली होती. जय सीयाराम” असं म्हणत कंगनाने हा खास फोटो शेअर केला आहे. या फोटोत कंगनाने लाल रंगाची साडी परिधान केल्याचं दिसतंय. तसचं केसात तिने गजरा माळला आहे. कंगनाचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हे देखील वाचा: “उदय चोप्रा आणि मी पाच वर्ष…”; नरगिस फाकरीने अखेर सोडलं मौन

kangana-sita
(Photo-Instagram@kanganaranaut)

मंगळवारी कंगना रणौतने एक पोस्ट शेअर करत ती ‘सीता’ सिनेमात मुख्य भूमिका साकारत असल्याचं जाहीर केलंय. कंगनाच्या या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. तसचं या सिनेमासाठी फिल्म मेकर्सनी कंगनाची निवड केल्याबद्दलही अनेकांनी निर्माते आणि दिग्दर्शकाच कौतुक केलंय.

‘सीता’ सिनेमा हा एक मायथोलॉजिकल ड्रामा आहे. अलौकिक देसाई विजयेंद्र प्रसाद यांच्यासोबत या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. हिंदीसोबतच हा सिनेमा तमिल, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. यासोबतच कंगना लवकरच ‘तेजस’, ‘धाकड़’, ‘मणिकर्णिका रिटर्न्‍स’ आणि ‘इमर्जेंसी’ या सिनेमातही झळकणार आहे.