News Flash

जावेद अख्तर बदनामी प्रकरणी कंगना चौकशीसाठी गैरहजर

मुंबईबाहेर असल्याने चौकशीला येऊ शकणार नाही, असे कंगनाने पोलिसांना कळविले.

गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत जुहू पोलिसांच्या चौकशीला शुक्रवारी गैरहजर राहिली. मुंबईबाहेर असल्याने चौकशीला येऊ शकणार नाही, असे कंगनाने पोलिसांना कळविले.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगना राणावतने अख्तर यांच्याबाबत बदनामीकारक टिप्पणी केली होती. यावर आक्षेप घेऊन अख्तर यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये कंगनाविरोधात अंधेरी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणात न्यायालयाने कंगनाची चौकशी करून अहवाल १ फे ब्रुवारीला सादर करण्याचे आदेश जुहू पोलिसांना दिले होते. त्यानुसार या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी कंगनाला समन्स बजावले होते. मात्र मुंबईबाहेर असल्याने कंगना चौकशीला उपस्थित राहिली नाही. निवेदनाद्वारे पोलिसांना तिने याची माहिती दिली. दरम्यान आता पुढील तारखेला पोलिसांकडून कंगनाची चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 12:24 am

Web Title: kangana absent for questioning in javed akhtar defamation case abn 97
Next Stories
1 ‘तारक मेहता…’मधील सोनूने शेअर केलेला फोटो पुन्हा चर्चेत, चाहते म्हणाले…
2 ‘या’ कारणामुळे शक्तिमानमधील गीताला आले होते बदलण्यात, १५ वर्षांनंतर मुकेश खन्नांनी केला खुलासा
3 डॉक्टर डॉन मालिकेत सागर कारंडेची एण्ट्री
Just Now!
X