भावाच्या लग्नकार्यामुळे चौकशीस हजर राहणे शक्य नाही, असे अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांनी वकिलामार्फत वांद्रे पोलिसांना कळवले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार वांद्रे पोलिसांनी गेल्या आठवडय़ात कंगना, रंगोली यांच्याविरोधात देशद्रोह, धर्मभावना भडकेल यासाठी जाणीवपूर्वक केलेली कृती आदी कलमांनुसार गुन्हा नोंदवला होता.
याप्रकरणी पोलिसांनी समन्स पाठवून कंगनाला सोमवारी, तर रंगोलीला मंगळवारी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र भावाचे लग्नकार्य आणि अन्य विधी असल्याने चौकशीस हजर राहता येणार नाही. त्यामुळे आपल्याला १५ नोव्हेंबरनंतर बोलवावे, असे कंगनाने वकिलामार्फत वांद्रे पोलिसांना कळवले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 27, 2020 12:25 am