News Flash

Video : बॉलिवूडच्या क्वीननं वाहिली बाळासाहेबांना आदरांजली

'बाळासाहेब ठाकरे हे हिंदुस्थानाच्या नेहमीच स्मरणात राहतील'

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बॉलिवूडची क्वीन कंगान रणौत हिनं बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. ‘राष्ट्रभक्त बाळासाहेब ठाकरे हे हिंदुस्थानाच्या नेहमीच स्मरणात राहतील. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम’ असं म्हणत कंगनानं आदरांजली वाहिली आहे. कंगनानं ‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमतर्फे बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे.

कंगनाचा ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटासोबतच बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपटदेखील हिंदी आणि मराठी भाषेतही प्रदर्शित होत आहे. त्यामुळे कंगनाच्या या चित्रपटासमोर ‘ठाकरे’ चित्रपटाचं मोठं आव्हान असणार आहे. २५ जानेवारीला हे दोन्ही चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे. या तारखेला केवळ ‘ठाकरे’ हा एकमेव चित्रपट प्रदर्शित व्हावा अशी अनेकांची इच्छा होती. या चित्रपटासाठी इम्रानच्या ‘व्हाय चीट इंडिया’ आणि हृतिकच्या ‘सुपर ३०’ नं आपल्या प्रदर्शनाची तारीख बदलली.

मात्र कंगनानं आपल्या चित्रपटाची तारीख बदलली नव्हती. ‘मणिकर्णिकाच्या प्रदर्शनाची तारीख फार पूर्वीच निश्चित करण्यात आली होती. तसेच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलावी यासाठी कोणताही दबाव मणिकर्णिकाच्या टीमवर नाही. तारीख बदलण्यासाठी कोणीही आम्हाला विनंती केलेली नाही. एकाच दिवशी दोन चित्रपट प्रदर्शित होऊ शकतात’ असं कंगनानं काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे २५ जानेवारीला ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ आणि ‘ठाकरे’ हे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2019 1:18 pm

Web Title: kangana and team manikarnika remembers the eminent and noble balasahebthackeray on his birth anniversary
Next Stories
1 गोविंदा आणि माझं करिअर संपवण्याचा ‘ग्लॅमरस माफियां’चा डाव, पहलाज निलहानींचा आरोप
2 शिल्पा, शमिता शेट्टीवर २१ लाखांचं कर्ज बुडवल्याचा व्यावसायिकाचा आरोप
3 ‘ठाकरे’ चित्रपटाला ‘मनसे’ शुभेच्छा, दादरमध्ये पोस्टरबाजी
Just Now!
X