07 March 2021

News Flash

कंगना रणौतला पुन्हा एकदा येतेय मुंबईची आठवण; म्हणाली…

कंगना रणौतला येतेय मुंबईची आठवण; 'हे' फोटो पाहून झाली भावूक

अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. अलिकडेच ती मुंबई प्रकरणामुळे प्रचंड चर्चेत होती. मुंबई ही तिला पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटू लागली आहे, अशी टीका तिने एका ट्विटमार्फत केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा तिने मुंबईबाबत ट्विट केलं आहे. कंगनाला मुंबईची प्रचंड आठवण येतेय असं तिने या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अवश्य पाहा – KBC मुळे अमिताभ झाले करोडपती; एका एपिसोडचं मानधन पाहून व्हाल थक्क

अवश्य पाहा – Halloween Night 2020: हे चित्रपट कधीही लहान मुलांसोबत पाहू नका

“मुंबईमधील एका गोष्टीची मला खूप आठवण येतेय. येथील रेस कोर्स. या ठिकाणी मी नेहमी घोडसवारी करायचे. मी कधीही स्पोर्ट्स पर्सन नव्हते. पण मला घोड्यावर स्वार होणं खुप आवडायचं. घोड्यावर बसून संतुलन राखणं मला आवडायचं.” असं ट्विट कंगनाने केलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

मुंबई सोडताना काय म्हणाली होती कंगना?

“मी अत्यंत जड अंत:करणानं मुंबईचा निरोप घेत आहे. माझी निंदा नालस्ती केली गेली, ऑफिसपाठोपाठ माझं घर तोडण्याचा प्रयत्न झाला. सुरक्षारक्षकांचा पहारा माझ्याभोवती ठेवावा लागला. ज्याप्रकारे मला दहशत दाखवण्यात आली ते बघता पाकव्याप्त काश्मीरची तुलना वर्मी लागली असंच म्हणावं लागेल.” मुंबई सोडताना कंगनाने अशा आशयाचं ट्विट केलं होतं. या ट्विटद्वारे तिने पुन्हा एकदा आपल्या टीकाकारांवर निशाणा साधला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2020 3:14 pm

Web Title: kangana ranaut about mumbai mppg 94
Next Stories
1 Video : एजाज-पवित्राच्या प्रेमाला बहर; ‘बिग बॉस’च्या घरात रंगली रोमॅण्टिक डेट
2 ‘बिग बॉसच्या घरात फिक्सिंग होतंय’; कविता कौशिकचा आरोप
3 ‘या राजकीय व्यक्तीचा स्वॅग पाहा’; स्वराने शेअर केलेला व्हिडीओ होतोय व्हायरल
Just Now!
X