News Flash

कंगना रणौत इंदिरा गांधींच्या भूमिकेत

इंदिरा गांधी यांच्या काळातील आणीबाणी आणि ऑपरेशन ब्लूस्टार या दोन मोठ्या निर्णयही या सिनेमात दाखवले जाणार

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या चरित्र चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. कंगणानं व्टिट करत याबाबतची माहिती दिली आहे. ‘थलाइवी’नंतर कंगनाचा हा दुसरा राजकीय चित्रपट असणार आहे. इंदिरा गांधी यांच्यावर आधारित चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेले नाही.

कंगनानं ट्विट करत म्हटलेय की, ‘इंदिराजी माझ्यासाठी एक आयकॉनिक महिला आहेत. त्यांच्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटात काम करण्यासाठी मी तयार आहे. त्यासाठी मी फोटोशूटही केले आहे. मी ज्यावेळी बॉलीवूडमध्ये काम करायला सुरुवात केली होती तेव्हा मला वाटले नव्हते की मी कधी इंदिरा गांधींची भूमिका साकारेन. अशा आशयाचे व्टिट कंगणानं शेयर केले आहे. त्याला मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी प्रतिसाद दिला आहे.

देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत कंगना दिसणार आहे. परंतु हा सिनेमा इंदिरा गांधी यांचा बायोपिक नसेल असे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकर भूमिका साकारणार असल्याचेही कंगनाने म्हटले आहे.


हा सिनेमा एका पुस्तकावर आधारित असणार आहे. इंदिरा गांधी यांच्या काळातील आणीबाणी आणि ऑपरेशन ब्लूस्टार या दोन मोठ्या निर्णयही या सिनेमात दाखवले जाणार आहेत. या चित्रपटाचे कथानक साई कबीर यांनी लिहिलेलं आहे. शिवाय याचं दिग्दर्शनही साई कबीरचं करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2021 7:55 am

Web Title: kangana ranaut all set to play indira gandhi nck 90
Next Stories
1 ‘या’ मालिकेतून दया येणार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
2 सनीने सांगितला तिचा फॅशन मंत्र
3 माझा पगार ऐकून सलमान सरांना धक्काच बसला, मग…
Just Now!
X