बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. अलिकडेच तिने दिल्ली सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला विरोध केला होता. तिच्या या भूमिकेवर अभिनेत्री हिमांशी खुराना हिने संताप व्यक्त केला होता. तू भाजपाची प्रवक्ता झाली आहेस का? असा सवाल करत तिने कंगनावर जोरदार टीका केली होती. अर्थात या टीकेमुळे संतापलेल्या कंगनाने हिमांशीला ट्विटरवर ब्लॉक केलं आहे.

अवश्य पाहा – हा ठरला २०२० मधील सर्वाधिक लोकप्रिय शो; ‘दिल बेचारा’ आणि ‘मिर्झापुर’लाही टाकलं मागे

अवश्य पाहा – अभिनेत्याला मिळाली बॉम्बने घर उडवण्याची धमकी; एका फोनने उडाली खळबळ

अवश्य पाहा – ‘चमचेगीरीची देखील एक हद्द असते’; कंगनाच्या ट्विटवर गायकाचं जोरदार प्रत्युत्तर

“पंजाबी लोक प्रत्येकाचा आदर, सन्मान राखतात. पण वेळ आली तर जोरदार विरोध देखील करतात.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने तिला ब्लॉक केल्याची माहिती हिमांशीने दिली. सोबतच तिने ब्लॉक केल्याचा एक फोटो देखील शेअर केला आहे. यापू्र्वी देखील टीका करणाऱ्या अनेक कलाकारांना कंगनाने ट्विटरवर ब्लॉक केलं आहे. या पार्श्वभूमीवर हिमांशीची ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

काय म्हणाली होती हिंमाशी?

“ओह, आता ही भाजपाची प्रवक्ता देखील झाली का? कुठल्याही मुद्द्याला कसं फिरवायचं हिला आता चांगलंच जमतंय. बघा ना दंगल होण्याची शक्यता ती आधिच वर्तवतेय. मुख्यमंत्र्यांनी आधीच काहीतरी केलं असतं तर भर थंडीत घराबाहेर पडण्याची अशी वेळ आली नसती.” अशा आशयाचं ट्विट करुन हिमांशीने कंगनाला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.