गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत येत असलेल्या अभिनेत्री कंगना रणौत हिच्या घरी सध्या लग्नाची गडबड सुरु आहे. कंगनाच्या भावाचं म्हणजेच अक्षतचा लग्नसोहळा पार पडत असून संपूर्ण रणौत कुटुंब हा सोहळा एन्जॉय करत आहेत. कंगनादेखील या लग्नकार्यात व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, या काळातही ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. या लग्नसोहळ्यातील फोटो, व्हिडीओ शेअर करुन ती चाहत्यांना अपडेट्स देत आहे. यामध्ये अलिकडेच कंगनाने तिच्या डान्सचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कंगना आणि बहीण रंगोली या दोघींनी पारंपरिक गाण्यावर ताल धरल्याचं दिसून येत आहे.
कंगनाच्या भावाचं अक्षतचा लग्नसोहळा सध्या उदयपूरमध्ये होत असून येथे लग्नापूर्वीचे हळदी, संगीत, मेहंदी असे सोहळे रंगत आहेत. यात कंगनाने डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कंगना बेधुंद होऊन नाचताना दिसत आहे. राजस्थानच्या पारंपरिक गाण्यावर कंगना व रंगोली थिरकत आहेत.
Yes it’s a big day for our family but just got to know ki #arnabisback
So here we go …
Welcome back dear friend … pic.twitter.com/TYPPVHQsCz— Kangana Ranaut (@KanganaTeam) November 11, 2020
दरम्यान, कंगनाने आतापर्यंत या सोहळ्याचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोला तिने भाई की शादी हे कॅप्शन दिल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या कंगना लग्नसोहळ्यात व्यस्त असली तरी लवकरच ती तिच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणांकडे वळणार आहे. कंगना तेजस, धाडक आणि तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा बायोपिकमध्ये झळकणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 12, 2020 12:21 pm