बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना बिनधास्तपणे तिचं मत मांडताना दिसते. सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकदा ती वादातही अडकली आहे. मात्र, यावेळी कंगना स्वत: ट्रोल झाली आहे. कंगनाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केल्यानंतर तिला ट्रोल करण्यात आलं आहे.

कंगनाने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कंगनाच्या पाठी सूर्यास्त होताना दिसत आहे. कंगना समुद्र किनाऱ्याजवळ आहे. तर कंगनाने या फोटोत पांढऱ्या रंगाचे ब्रालेट आणि पांढऱ्या रंगाची पँट परिधान केली आहे. कंगनाने गळ्यात गोल्डन चेन परिधान केली आहे. कंगना या फोटोंमध्ये सुंदर दिसत आहे.

Bengluru
VIDEO : ‘जय श्री राम’ म्हटल्याने बंगळुरूमध्ये तिघांवर हल्ला, झेंडाही पळवला
Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
indian man killed in canada
कॅनडामध्ये भारतीय तरुणाची हत्या? कारमध्ये आढळला मृतदेह, पोलीस म्हणाले…

आणखी वाचा : ‘माधुरी दीक्षित दे, आम्ही लगेच इथून निघून जाऊ’, पाकिस्तानच्या मागणीला कॅप्टन विक्रम बत्रांनी दिले ‘असे’ उत्तर

kangana ranaut, kangana ranaut instagram,
कंगनाच्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

 

कंगनाने तिचा असा बोल्ड फोटो बऱ्याच काळानंतर शेअर केला आहे. तिचा हा बोल्ड फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. अनेकांचे म्हणने आहे की इतर सेलिब्रिटींना त्यांच्या कपड्यांवरून सल्ला देते आणि स्वत: ब्रालेटमध्ये फोटो शेअर करते. एक नेटकरी म्हणाला, ‘तू एवढा घाणेरडा ड्रेस परिधान करशील अशी अपेक्षा नव्हती कंगना.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तू स्वतः इतरांच्या पोस्टवर कमेंट करते, असा फोटो शेअर करताना तू विचार केला नाहीस का?’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘तू स्वत: ला सभ्य सनातन महिला म्हणते, तर हे सगळं काय आहे. दोन चेहरे कोणासाठी?’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘तू बॉलिवूडला आणि रिहानाला कपड्यावरून ज्ञान देते. आता काय झालं. भाजपाने तुला बाहेर काढलं का?’, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी कंगनाला ट्रोल केलं आहे.

आणखी वाचा : गर्भवती असताना सैफसोबतच्या ‘सेक्स लाइफ’विषयी करीना कपूरने केलं भाष्य म्हणाली…

कंगना लवकरच ‘थलायवी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कंगना दिवंगत अभिनेत्री आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक ए.एल. विजय आहेत. या चित्रपटा व्यतिरिक्त कंगना लवकरच ‘तेजस’ आणि ‘धाकड’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.