दिवसंदिवस वाढत्या करोना संक्रमणाला पाहता जनता मोदी सरकारवर टीका करत आहे. यामुळे ट्विटरवर अनेक हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहेत. यावर बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतने ट्वीट करत तिचं मत मांडल आहे. कंगनाने पंतप्रधान हे देशासाठी पित्यासमान असल्याचे म्हटले आहे. कंगनाचे हे मत अनेकांना पटलेलं नाही.

कंगनाचं हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. “पंतप्रधान म्हणजेच देश आहे. ते आपल्यापेक्षा वेगळे आहेत असा विचार चुकीचा आहे. असं असेल तर मग लोकशाहीचं ढोंग का करावं?. मतदान करत एक प्रतिनिधी निवडण्यासाठी एवढा मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च का करावा? पंतप्रधान हे देशासाठी पित्यासमान आहेत. त्यांच्यावर शंका आणि किंवा त्यांचा पराभव किंवा पराभवाची इच्छा करणे म्हणजे मूर्खपणाच आहे,” अशा आशयाचे ट्वीट कंगनाने केले आहे.

तर सुर्य प्रकाश सिंग यांना कंगनाचे मत पटलेले नाही. ते कंगनाचं ट्वीट रिट्वीट करत म्हणाले, “पंतप्रधानच देश आहे ? कंगना जी, तुमच्यासाठी जो कोणी ट्वीट लिहित आहे, त्याने ‘नागरिकशास्त्र’चे पुस्तक आठवीपर्यंतही वाचलेले नाही. लोकशाही हा शासनाचा एक प्रकार आहे, ज्यात संपूर्ण शक्ती ही जनतेच्या हातात असते, जनता अंतिम निर्णय घेते. कृपया अजून अभ्यास करा.”

कंगना गेल्या अनेक दिवसांपासून करोना आणि राजकीय विषयावर तिचं मत मांडताना दिसत आहे. या आधी कंगनाने पाकिस्तानची स्तुती करणारे ट्वीट केले होते.

दरम्यान, कंगना लवकरच ‘तेजस’ आणि ‘धाकड’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तर, कंगनाचा ‘थलायवी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. मात्र, करोनाच्या वाढत्या संक्रमणाला पाहता चित्रपटाच्या प्रदर्शणाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. या चित्रपट कंगना तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे.