News Flash

कंगनाने केली पाकिस्तानची स्तुती, ट्वीट व्हायरल

जाणून घ्या काय म्हणाली कंगना...

बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत बिनधास्तपणे सोशल मीडियावर मत मांडताना दिसते. कंगना तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. आता कंगनाने ट्विटरवर ट्रेंड होणारं हॅशटॅग #PakistanStandsWithIndia वर तिची प्रतिक्रिया देत ट्वीट केलं आहे. कंगनाचं हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी शेजारचा देश पाकिस्तान आपल्याला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. पाकिस्तानमध्ये ट्विटरवर ट्रेंड होणार हॅशटॅग #PakistanStandsWithIndia वर कंगनाने प्रतिक्रिया दिली आहे. “पाकिस्तानच्या ट्विटरवर टॉप ट्रेंड होणार हॅशटॅग #PakistanstandswithIndia पाहून आनंद झाला. भारताचे वीर पुरूष मोदींनी दिलेल्या लसीचे त्यांनी कौतुक केले, या कठीण काळात आम्ही त्यांच्या सहानुभूतीचा आदर करतो ,” अशा आशयाचे ट्वीट कंगनाने केले आहे.

दरम्यान, कंगनाचा ‘थलायवी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगना तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘थलायवी’ तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. करोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे चित्रपटाच्या प्रदर्शणाची तारीख ही पुढे ढकलण्यात आली आहे. यानंतर कंगना ‘तेजस’ आणि ‘धाकड’ या दोन चित्रपटांमध्ये दिसेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 7:24 pm

Web Title: kangana ranaut calls pakistani people s support for india heartwarming nice to see them reciprocate with love dcp 98
Next Stories
1 “पंतप्रधान हे देशासाठी पित्यासमान आहेत”, कंगना रणौतने केलं ट्वीट
2 “…म्हणून मी अजूनही सिंगल आहे”, कंगनाने केला खुलासा
3 झारखंडच्या मुलीला हार्वर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती; प्रियांका चोप्रा आणि नव्या नंदाने केलं कौतुक
Just Now!
X