News Flash

“उर्मिला मातोंडकर ही सॉफ्ट पॉर्न स्टार”; कंगना पुन्हा बरळली

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाची उर्मिला मातोंडकर यांच्यावर टीका

“उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्न स्टार आहे. त्या अभिनयासाठी तर नक्कीच ओळखल्या जात नाहीत”, अशा शब्दांत अभिनेत्री कंगना रणौतने उर्मिला मातोंडकर यांच्यावर टीका केली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने उर्मिला मातोंडकर यांच्या वक्तव्यांना उत्तर देत होती. कंगनाचं मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य, तिला देण्यात आलेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा, ड्रग्सवरून तिने बॉलिवूडवर केलेली टीका यावरून उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाचा खरपूस समाचार घेतला होता. त्यालाच उत्तर देत कंगनाने उर्मिला यांना ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ म्हटलं.

‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली, “मी उर्मिला मातोंडकर यांनी दिलेली एक मुलाखत पाहिली. संपूर्ण मुलाखतीत त्या मला चिडवत होत्या. माझ्या संघर्षाची खिल्ली त्यांनी उडवली. भाजपाकडून तिकिट मिळावं यासाठी मी हे सर्व बोलत असल्याचं त्यांनी म्हटलं. पण मला तिकिट मिळवणं काही इतकं अवघड नाही, हे एखाद्या हुशार व्यक्तीला सहज समजेल. त्यासाठी मी माझ्या आयुष्याशी खेळणार नाही आणि माझ्या संपत्तीचीही वाट लावून घेणार नाही.”

उर्मिला यांच्यावर टीका करत कंगना पुढे म्हणाली, “उर्मिला मातोंडकर या सॉफ्ट पॉर्न स्टार आहेत. त्या त्यांच्या अभिनयासाठी नक्कीच ओळखल्या जात नाहीत. कशामुळे ओळखल्या जातात मग? सॉफ्ट पॉर्नसाठीच ना? जर त्यांना तिकिट मिळू शकतं तर मला का नाही मिळणार? कोणालाही तिकिट मिळू शकतं.”

कंगनाच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून तिच्यावर टीका होत आहे. #shutupkangana असा हॅशटॅग ट्विटरला ट्रेण्ड होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 11:39 am

Web Title: kangana ranaut calls urmila matondkar soft porn star ssv 92
Next Stories
1 पंकज त्रिपाठी निगेटिव्ह भूमिका निवडताना करतात ‘या’ गोष्टींचा विचार
2 Happy Birthday disha : दयाबेनचा पहिला चित्रपट कोणता माहित आहे का?
3 अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेरील सुरक्षेमध्ये वाढ
Just Now!
X