08 December 2019

News Flash

‘ती माझ्यासोबत नेपोटिझम कार्ड खेळू शकत नाही’, तापसीचं रंगोलीला उत्तर

रंगोलीने तापसीला 'सस्ती कॉपी' असं म्हटलं होतं

सडेतोड वक्तव्य आणि बोचऱ्या मतांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. कंगनाच्या आगामी ‘जजमेंटल है क्या ?’ या चित्रपटाच्या नावाची घोषणा झाल्यापासून कंगना सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत येत आहे. त्यातच काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्री तापसी पन्नूने सोशल मीडियाच्या माध्यमातून या ट्रेलरचं कौतुक केलं होतं. मात्र तापसीचं हे ट्विट कंगनाची बहिण रंगोलीला पटलं नसून तिने तापसीला ‘सस्ती कॉपी’ असं म्हटलं होतं. त्यानंतर तापसीनेही रंगोलीला सडेतोड उत्तर दिलं होतं. मात्र तेव्हापासून या दोघींमध्ये शितयुद्ध सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये तापसीने पुन्हा एकदा या विषयावर भाष्य करत रंगोलीला उत्तर दिलं आहे.

‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तापसीने या प्रकरणी तिचं मत स्पष्टपणे मांडत रंगोलीला पुन्हा एकदा सडेतोड उत्तर दिलं. “त्यावेळी केवळ अनुराग कश्यपच नाही, तर कलाविश्वातील अनेक जण माझ्या बाजूने उभे राहत रंगोलीला उत्तर देण्यास तयार होते. मात्र मीच त्यांना असं करण्यापासून थांबविलं. हे प्रकरण आणखी वाढू नये अशी माझी इच्छा होती. कारण आज मी ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मला प्रचंड स्ट्रगल करावा लागला आहे. त्यामुळे कोणीही माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करु नये, माझ्यासोबत नेपोटिझम कार्ड खेळू नये अशी माझी इच्छा होती”, असं तापसी म्हणाली.

पुढे ती म्हणते, “मला शाब्दिक वादामध्ये अडकायचं नाहीये. कारण ती ज्या पद्धतीने बोलते, तसं मी बोलू शकत नाही आणि हा सस्ती कॉपीचा मुद्दा आहे, तर हो ती जास्त कमाई करणारी अभिनेत्री आहे, तर मी ‘स्वस्त’ अभिनेत्री आहे. आम्ही दोघी आमची मत ठामपणे मांडणाऱ्या व्यक्ती आहोत, मात्र कधी कधी याचे दुष्परिणामही भोगावे लागतात. तो ट्रेलर पाहून मी मनापासून कौतुक केलं होतं. माझ्या मनात तिचा अपमान करावा असा विचारदेखील नव्हता.”

दरम्यान, रंगोलीने तापसीवर टीकेची झोड उठविल्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यप तापसीच्या मदतीला धावला होता. ‘हे जरा अति होते आहे आणि तू जे काही बोलते आहेस ते निराशा करणारे आहे.’ या आशयाचे ट्विट अनुराग कश्यपने केले होतं.

First Published on July 22, 2019 12:04 pm

Web Title: kangana ranaut can not play the nepotism card with me says tapsee pannu ssj 93
Just Now!
X