25 February 2021

News Flash

“ही आत्महत्या नाही, हत्याच”; सुशांतच्या मृत्यूवरून कंगना भडकली

सुशांत सिंग राजपुतने आत्महत्या केली नाही - कंगनाचा आरोप

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. ती नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असते. यावेळी तिने सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्येवरुन बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. सुशांतने आत्महत्या केली नव्हती तर त्याचा खून झाला आहे असं धक्कादायक व्यक्तव्य तिने केलं आहे.

कंगनाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने सुशांतच्या मृत्यूसाठी बॉलिवूड इंडस्ट्रीला जबाबदार धरले आहे. “सुशांत इतका कमकूवत नव्हता. तो लढवय्या प्रवृत्तीचा होता. इंजिनियरींमध्ये पहिला क्रमांक पटकावणारा सुशांत मेंदूने कमकूवत कसा असू शकतो?बॉलिवूडमधील काही लोकांनी आत्महत्येचा विचार त्यांचा मेंदूमध्ये रुजवला. त्याने आत्महत्या केली नसून त्यासाठी त्याला प्रवृत्त करण्यात आले होते. नियोजनबद्ध पद्धतीने त्याची हत्या झाली.” असा आरोप कंगनाने या व्हिडीओमध्ये केला आहे. कंगनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सुशांतचा थक्क करणारा प्रवास

सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2020 5:40 pm

Web Title: kangana ranaut comment on bollywood over sushant singh rajput suicide mppg 94
Next Stories
1 अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
2 सुशांत सिंहची मैत्रीण रिया चक्रवर्तीची पोलिसांकडून चौकशी होणार?
3 ‘त्या लोकांच्या कर्मामुळे तुझा जीव गेला’; सुशांतसाठी दिग्दर्शकाचं भावनिक ट्विट
Just Now!
X