News Flash

‘बॉलिवूड क्वीन’ हेअरस्टायलिशच्या रुपात; बहिणीचा केला हेअरकट

पाहा, रंगोलीचा नवा हेअरकट

करोना विषाणूमुळे देशात सुरु असलेल्या लॉकडाउनच्या अटी काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्या आहे. त्यामुळे नागरिकांबरोबरच काही सेलिब्रिटीही घराच्या बाहेर पडताना दिसत आहेत. मात्र काही सेलिब्रिटी अद्यापही सुरक्षेच्या दृष्टीने घरातच आहेत. यामध्येच अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोलीदेखील घरीच असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे घरी राहून या दोघी मस्तपैकी सुट्टीचा आनंद घेत आहेत. यातच रंगोलीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत कंगना तिची हेअरस्टायलिश झाल्याचं सांगितलं आहे.

रंगोलीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात कंगना तिचे केस कापत आहे. विशेष म्हणजे कंगनाने रंगोलीचा उत्तम हेअर कट केला आहे. “मला बऱ्याच दिवसांपासून केस कापायचे होते. मी खरंतर मुंबईतच माझे केस कापते. मात्र ही कायमच प्रत्येक गोष्ट करण्यासाठी तयार असते. माझा नवा हेअरकट कसा वाटला”, असं कॅप्शन रंगोलीने या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, सध्या रंगोली आणि कंगना मनालीमध्ये त्यांच्या घरी आहेत. लॉकडाउन सुरु होण्यापूर्वीच या दोघी बहिणी मनालीसाठी रवाना झाल्या होत्या. विशेष म्हणजे या लॉकडाउनच्या काळात कंगना घरी राहून नवनवीन गोष्टी शिकत आहे. अलिकडेच तिने रंगोलीच्या नवीन घराचं इंटेरिअरसुद्धा केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 12:10 pm

Web Title: kangana ranaut cuts sister rangoli chandel s hair at home ssj 93
Next Stories
1 अभिनेत्रीला करोनाची लक्षणं पण चाचणीच कोणी करेना; सरकारकडे केली विनंती
2 ‘लॉकडाउन कमी होतोय पण…’; लता मंगेशकरांचं जनतेला आवाहन
3 चिरंजीवीच्या निधनानंतर त्याच्या भावाची पोस्ट वाचून तुम्हीही भावूक व्हाल
Just Now!
X