News Flash

इटलीतील पुरस्कार सोहळ्याला जाण्यासाठी इतका खर्च झाला की…; कंगनाने सांगितला ‘तो’ किस्सा

कंगनाने सांगितला आपला खडतर प्रवास

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ती बॉलिवूडमधील घराणेशाही विरोधात आवाज उठवल्यामुळे चर्चेत आहे. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या फिल्मी करिअरचा अनुभव सांगताना काही धक्कादायक खुलासे केले. आयुष्यातील पहिल्या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी तिच्याकडे एकही चांगला पोशाख नव्हता.

कंगनाने ‘गँगस्टर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी तिला ‘आयफा पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले होते. परंतु या पुरस्कार सोहळ्यात घालण्यासाठी तिच्याकडे चांगले कपडे नव्हते. या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन इटलीमध्ये करण्यात आले होते. तिथे जाण्यातच तिचे सर्व पैसे संपले. तिच्या खात्यात केवळ १५०० रुपये शिल्लक होते. परिणामी स्टाईलिश कपड्यांअभावी तिने पुरस्कार सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत तिचा मित्र रिक रॉय धावून आला. त्यावेळी रिक रॉय या फॅशन डिझायनरने तिला मदत केली होती. असा अनुभव पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने सांगितला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 5:37 pm

Web Title: kangana ranaut didnt have money to afford gowns for award nights mppg 94
Next Stories
1 सलमानला पाठिंबा दिल्याने सुनील ग्रोवर झाला ट्रोल, दिले अनोख्या अंदाजात उत्तर
2 ‘तान्हाजी’मधला धैर्यशील म्हणतोय, “नैराश्यावर अशी करुया मात”
3 “दर वर्षी हे चिनी लोक हृदय तोडतात”; अभिनेत्याचा ‘डॉग मीट फेस्टिव्हल’ला विरोध
Just Now!
X