News Flash

कंगना रणौतचं डिजिटल विश्वात पदार्पण, ‘मणिकर्णिका फिल्मस्’चा लोगो लॉन्च

'टिकू वेडस् शेरू' सिनेमाची निर्मिती करणार

कंगना रणौतचं डिजिटल विश्वात पदार्पण, ‘मणिकर्णिका फिल्मस्’चा लोगो लॉन्च

अभिनेत्री कंगना करणौत डिजिटल विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज झालीय. निर्माती म्हणून कंगना डिजिटल विश्वात एण्ट्री करतेय. कंगना तिच्या ‘मणिकर्णिका फिल्मस् ‘ या प्रोडक्शन हाउसची निर्मिती असलेला ‘टिकू वेडस् शेरू’ या सिनेमाच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करतेय. या सिनेमाच्या घोषणेसोबतच कंगनाने तिच्या प्रोडक्शन हाउसचा लोगो देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.

कंगनाने एक ट्विट करत लोगो लॉन्च केल्याची माहिती दिली. ‘मणिकर्णिका फिल्म्स’ चा लोगो लॉन्च करण्यात आलाय. यासोबतच ‘टिकू वेडस् शेरू’ ही या लव्ह स्टोरीतून आम्ही डिजिटल विश्वात पदार्पण करत आहोत. तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाची गरज आहे. ” असं कंगना तिच्या ट्विटमध्ये म्हणाली आहे.

येत्या काळात कंगना अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. धाकड, तेजस आणि ‘मणिकर्णिका रिटर्न्स : दि लिजेंड ऑफ दिद्दा’ या सिनेमांवर ती सध्या काम करतेय. त्याचसोबत गेल्या काही दिवसांपासून कंगना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर देशातील घडामोडींवर ती परखडपणे मत मांडताना दिसतेय. यामुळे तिला अनेकदा ट्रोलही व्हावं लागतं.

तर आता कंगनाने अमेरिकेसह इतर देशांवर तोफ डागण्यास सुरुवात केलीय. भारत कठीण परिस्थितीचा सामना करत असताना इतर देश एकत्र येऊन भारताला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रय्तन सुरू असल्याचा आरोप तिने केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2021 1:23 pm

Web Title: kangana ranaut digital debut with tiku weds sheru launched her manikarnika logo kpw 89
Next Stories
1 ‘न्यूड सीन देण्यास माझा नकार नाही, पण…’, नेहा पेंडसेचा खुलासा
2 “सोनू सूद निवडणुकीत उभा राहीला तर…!”
3 अनुष्काने विराटशी लग्न करण्यास दिला होता नकार, जाणून घ्या ‘विरुष्का’ची लव्हस्टोरी
Just Now!
X