अभिनेत्री कंगना रणौत आणि अभिनेता दिलजीत दोसांज या दोघांमध्ये शेतकरी आंदोलनावरुन ट्विटर वॉर सुरु आहे. एकीकडे कंगना शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोध करत आहे. तर दुसरीकडे दिलजीत शेतकऱ्यांना पाठिंबा देत कंगनावर निशाणा साधत आहे. दोघांमध्ये सुरु असलेलं हे शीतयुद्ध आता आणखी पेटलं आहे. दिलजीत शेतकऱ्यांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. असं म्हणत तिने पुन्हा एकदा अभिनेत्याला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. मात्र यावेळी तिने या वादात अभिनेत्री प्रियांका चोप्राला देखील ओढलं आहे.

अवश्य पाहा – हे घर आहे की शहर… पाहा मायकल जॅक्सनचं अब्जावधींचं घर

अवश्य पाहा – प्रियांकाचा ग्लॅमरस लूक पाहून हृतिक झाला घायाळ; म्हणाला, तू तर…

“दिलजीत आणि प्रियांका चोप्रा जे शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्याचा आव आणत आहेत त्यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून आपली भूमिका मांडावी. उगाच सरकारला विरोध करायचाय म्हणून टीका करु नये. दोघंही शेतकऱ्यांची माथी भडकवून गायब झाले आहेत. शेतकऱ्यांची अवस्था काय झाली आहे ते पाहा.” अशा आशयाचं ट्विट तिनं केलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – “हॅण्डल विथ केअर नाहीतर…”; स्ट्रिपलेस फोटो शेअर करत क्रितीने दिला इशारा

अवश्य पाहा – गर्लफ्रेंडला महागडे गिफ्ट्स देण्यासाठी बॉलिवूड लेखकाची अजब युक्ती; पोलिसांनी केली अटक

शेतकरी आंदोलन लवकरच राष्ट्रीय मुद्दा होईल – सर्वोच्च न्यायालय

शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध होत आहे. दिल्ली आणि दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून, रस्ते बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सीमेवरून हटवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे आणि न्यायमूर्ती ए.एस. बोपण्णा आणि व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयानं शेतकरी आंदोलनावर चिंता व्यक्त करत लवकर तोडगा काढण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले आहेत. “कायदे आपल्याविरोधात असल्याची समजूत शेतकऱ्यांची झाली आहे आणि सरकारने खुलेपणाने चर्चा केली नाही, तर तोडग्यासाठीची चर्चा पुन्हा अपयशीच होईल,” असं फटकारत आंदोलनाचं नेतृत्व करणारे पक्ष कोणते आहेत,” अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयानं केंद्राकडे केली.