बॉलिवूडची क्विन अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशातील राजकारण अशा विविध विषयांवर ती रोखठोक मतं मांडते. यावेळी तिने इकोफ्रेंडली दिवाळीच्या निमित्ताने ख्रिसमस आणि ईद या सणांवर निशाणा साधला आहे. जर दिवाळी फटाक्यांविना साजरी केली जाऊ शकते तर ईद प्राण्यांच्या हत्येविना अन् ख्रिसमस झाडं कापल्याशिवाय साजरी केली जाऊ शकत नाही का? असा सवाल तिने केला आहे.

अवश्य पाहा – ‘रेप सीन पाहून आईनं घरातून बाहेर काढलं होतं’; रंजीत यांनी सांगितला थक्क करणारा अनुभव

“चला दिवाळी फटाके फ्री, ख्रिसमस झाडांना कापल्याशिवाय अन् ईद प्राण्यांची हत्या केल्याशिवाय साजरी करुया. सर्व लिबरल्स मंडळी माझ्याशी सहमत आहेत का? जर नाही तर तुम्ही कोणत्या बाजूने आहात हे स्पष्ट कळतंय. स्वत:ला विचारा तुमच्या खऱ्या इच्छा काय आहेत?” अशा आशयाचं ट्विट कंगनाने केलं आहे. तिचं हे ट्विट दिवाळीच्या निमित्ताने सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – अभिनेत्रीने पाळल्या ८० हजार मधमाशा; कारण वाचून व्हाल थक्क

दिवाळीच्या दिवसात सायंकाळी सहानंतर ध्वनिप्रदूषणाचा स्तर सामान्य स्तरापेक्षा सुमारे ४५ ते ५० टक्क्यांनी वाढतो. व्यावसायिक भागात ६५ डेसिबल्स, औद्योगिक भागात ७५ ते ८५ डेसिबल आणि निवासी भागात ५५ डेसिबलची ध्वनिमर्यादा घालून देण्यात आली आहे. मात्र, याचे पालन कुठेच होत नाही. प्रकाश फेकणाऱ्या फटाक्यांमुळे पक्ष्यांच्या डोळ्यांवर अत्यंत विपरीत परिणाम होतो. अतितीव्र प्रकाशामुळे पक्ष्यांना आंधळेपणा येतो आणि अंधारात चाचपडल्यामुळे भिंतीवर आदळूनही त्यांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. फटाक्यांच्या मोठय़ा आवाजाने पक्षी खाली पडून जखमी आणि मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. रॉकेट्समुळे आणि वर जाऊन फुटणाऱ्या फटाक्यांमुळे पक्ष्यांचा अधिवास म्हणजेच झाडावरील त्यांची घरटी जळतात. पशुपक्ष्यांची ध्वनी ऐकण्याची क्षमता मानवापेक्षा सात पटीने अधिक असते. या आवाजामुळे पक्ष्यांच्या कानाच्या नसा तुटण्याची दाट शक्यता असते. फटाक्यांचा सर्वाधिक परिणाम चिमण्यांवर होतो. एकटय़ा चेन्नईत दरवर्षी दिवाळीच्या दिवसात १३ टक्के चिमण्यांचा मृत्यू ध्वनिप्रदूषणामुळे होत असल्याचे समोर आले आहे.