सोशल मीडियावर कायम वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कंगना रणौतने तिच्या व्हॅलेन्टाईन डे’ चे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अनेक सेलिब्रिटींनी ‘व्हॅलेन्टाईन डे’ च्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.
कंगना रणौतने मात्र तिचा ‘व्हॅलेन्टाईन डे’ जरा हटके सेलिब्रेट केला आहे. मध्य प्रदेशमधील सातपुड्याच्या व्याघ्र प्रकल्पाला कंगनाने भेट दिली. जंगल सफारी करत असतानाचे फोटो आणि व्हिडिओ तिने सोशल मीडियावरव शेअर केला आहे.

डेनिम जॅकेट, बूट आणि हातात दुर्बीण असा जंगल सफारीसाठी कंगनाने स्टायलीश लूक केल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. या जंगल सफारीमध्ये एका वाघाचंही दर्शन घडल्याचं कंगनानं तिच्या कॅप्शनमध्ये म्हंटल आहे.

वाघासोबतच इतर अनेक प्राणी या जंगल सफारीत कंगनाला पाहण्याची संधी मिळाली. व्याघ्र प्रकल्पातील जलसाठा आणि इथला निसर्ग पाहून एकदम फ्रेश वाटत आहे असंही तिने कॅप्शनमध्ये म्हंटलंय. जंगलाची सफर घडवल्याबद्दल तिने मध्य प्रदेश पर्यटन विभाग आणि वन खात्याचे आभार मानले आहेत.
कंगना रणौत मध्य प्रदेशमध्ये तिच्या ‘धाकड’ सिनेमाचं शूटींग करत आहे. या शूटींगमधून वेळ काढत कंगनाने एक दिवस सातपुड्याच्या अभयारण्यात निसर्गाची मजा लुटली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 15, 2021 11:28 am