अभिनेत्री कंगना रणौत आणि शेखर सुमनचा मुलगा अध्ययन सुमन बराच काळ रिलेशनशीपमध्ये होते. पण फार काळ हे नातं टिकू शकलं नाही. ब्रेकअपनंतर अध्ययनने कंगनावर मारहाण आणि काळी जादू केल्याचा आरोप केला. त्यामुळे बॉलिवूड वर्तुळात दोघांच्या रिलेशनशीप आणि ब्रेकअपच्या चर्चा जोरदार रंगल्या. या सर्व गोष्टींतून बाहेर आल्यानंतर आता अध्ययन पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. तो सध्या डॉ. स्तुती शर्माला डेट करत असल्याचे वृत्त ‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने दिलं आहे.

क्लिनिकल ऑडीओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट असलेली स्तुती दिल्लीत राहते. तिच्यासाठी अध्ययनने गाणंही रेकॉर्ड केलं असून हा अल्बम पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. याबद्दल तो म्हणाला की, ‘काही महिन्यांपूर्वीच आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. माझं गाणं मी पहिल्यांदा तिलाच ऐकवलं आणि ते तिला फार आवडलं.’

https://www.instagram.com/p/BZB4oWmnStE/

अध्ययनने त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी म्हणजेच कंगना रणौतबद्दलही यावेळी प्रतिक्रिया दिली. ‘भूतकाळाच्या गोष्टी विसरून मी आयुष्याची नव्याने सुरुवात केली आहे. कंगनाला मी कधीच माफ केलं आहे.’ त्यामुळे अध्ययनच्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही.