News Flash

मुंबईत कोसळता पाऊस पाहून रोमॅण्टिक झाली कंगना रनौत; म्हणाली, “जो माझ्यासाठी बनलाय तो….”

म्हणाली, "मुंबईच्या पावसापेक्षा जास्त रोमॅण्टिक काहीच नाही. अशात सिंगल मंडळी दिवसा फक्त स्वप्नच पाहू शकतात."

सोशल मीडियावर सगळ्यात जास्त सक्रिय असलेली अभिनेत्री म्हणजे कंगना रनौत होय. स्वतःचे सुंदर फोटोज शेअर करण्याबरोबरच सध्याच्या ट्रेंडिंग घडामोडींवर आपलं मत व्यक्त करत असते. मुंबईत सकाळपासूनच पाऊस कोसळतोय. धो-धो कोसळणाऱ्या पावसाला पाहून अभिनेत्री कंगना रनौत भलतीच रोमॅण्टिक झालीय. तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर स्वतःचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये ती साडीमध्ये दिसून आली. केसांचा अंबाडा बांधून आणि हलका फुलका मेकअप केल्याने तिचा रोमॅण्टिक अंदाज आणखी फुलून दिसला.

सकाळपासून कोसळणाऱ्या धो-धो पावसामुळे मुंबईत रोमॅण्टिक वातावरण तयार झालंय. अशा रोमॅण्टिक वातावरणात सिंगल मंडळी फक्त स्वप्नच पाहू शकतात, असं कंगना रनौतला वाटतंय. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा एक फोटो शेअर करत तिने रोमॅण्टिक कॅप्शन देखील लिहिली आहे. यात तिने लिहिलं, “मुंबईच्या पावसापेक्षा जास्त रोमॅण्टिक काहीच नाही. पण अशात सिंगल मंडळी दिवसा फक्त स्वप्नच पाहू शकतात. जो माझ्यासाठी बनलाय तो लवकर मला भेटू दे.” या कॅप्शनमध्ये तिने रेड हार्टचं इमोजी देखील वापरलंय.

अभिनेत्री कंगना रनौत काही दिवसांपूर्वी कुटुंबासह मनालीला गेली होती. त्यानंतर गेल्या मंगळवारी ती पुन्हा मुंबईत परतली आहे. मुंबईत तिला तिच्या ऑफिसमध्ये स्पॉट करण्यात आलं होतं. याशिवाय गेल्या वर्षी तिच्याकडे कोणतं काम नसल्यामुळे कर देखील भरू शकली नसल्याचं तिने काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 10:37 pm

Web Title: kangana ranaut feels romantic in mumbai rains says who is special for me please show up na prp 93
Next Stories
1 लवकरच काम सुरू करणार बॉलिवूडचे ‘महानायक’ अमिताभ बच्चन
2 रिया दिसणार द्रौपदीच्या भूमिकेत, आधुनिक महाभारतात साकरणार भूमिका?
3 अभिनेते बोमन इराणी यांच्या आईचे निधन
Just Now!
X