News Flash

स्वत:ला ‘हॉट संघी’ म्हणत कंगनाने शेअर केले बिकिनीमधील फोटो

सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

ती वादग्रस्त वक्तव्यांसाठी विशेष ओळखली जाते

बॉलिवडूची क्वीन कंगना रणौत सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. ती वादग्रस्त वक्तव्यांसाठी विशेष ओळखली जाते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. बऱ्याच वेळा तिला त्यामुळे ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. नुकताच कंगानाने सोशल मीडियावर तिचे बिकिनी लूकमधील फोटो शेअर केले असून स्वत:ला ‘हॉट संघी’ असे म्हटले आहे.

सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणाऱ्या कंगनाचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक झाल्यानंतर तिने मोर्चा इन्स्टाग्रामकडे वळवला आहे. ती इन्स्टाग्रामचा वापर मोठ्या प्रमाणावर करताना दिसते. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने बिकिनी परिधान केली आहे. पहिल्या फोटोमध्ये तिने गोल्डन बिकिनी परिधान केली आहे. या फोटोवर तिने ‘लिबरल्स: संघी महिला हॉट नसतात, मी: थांबा जरा..’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

actress Kangana Ranaut, bollywood actress, Kangana Ranaut,

आणखी वाचा : निया शर्मा आणि देवोलिनामधील ‘तू तू मै मै’वर पडला पडदा; दोघींनी मागितली माफी

त्यानंतर कंगनाने ब्लॅक बिकिनीमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोवर तिने ‘हॉट संघी’ असे लिहिले आहे. अप्रत्यक्षपणे कंगनाने स्वत:ला संघी म्हटले असून संघी महिला असे कपडे देखील परिधान करु शकतात असे म्हटले आहे. कंगनाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, कंगनाचा ‘थलायवी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगना तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित आहे. हा चित्रपट तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यानंतर कंगना ‘तेजस’ आणि ‘धाकड’ या दोन चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 4:51 pm

Web Title: kangana ranaut gave a befitting reply to the liberals by sharing a bikini photo avb 95
Next Stories
1 हॉटेलमध्ये केलेल्या ‘त्या’ चुकीसाठी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत उर्वशीने मागितली माफी
2 करोनाविरोधात बुद्धिबळाच्या पटावर गायक अरिजीत सिंह; विश्वनाथन आनंदसोबत रंगणार सामना
3 शुभ्रा मोडणार सुझॅनची खोड, ‘अग्गबाई सूनबाई’मध्ये नवे वळण
Just Now!
X